Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रभात फेरी संपन्न

जालना, :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यासाठी आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता युवा वर्गामध्ये एचआयव्ही-एड्स विषयी जनजागृती व्हावी याकरीता प्रभात फेरीचे (रॅली) आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथून करण्यात आले होते.
एचआयव्ही,एड्स विषयी जागतिक नागरीक म्हणून जगण्याची शपथ देण्यात येऊन प्रभात फेरीचे (रॅली) उद्घाटन मा. डॉ. प्रतापराव घोडके सर प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक जालना यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. याकार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. राजेंद्र गायके, प्रशासकिय अधिकारी सामान्य रुग्णालय गोपाळ कुलकर्णी जिल्हा समन्वयक तंबाखु नियंत्रण विभाग डॉ. संदिप गोरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजेश गायकवाड श्रीमती रायपुरे, सोनाली कोंडवार, अरुणा अकोलकर विविध नर्सिंग विद्यालय विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्यासह जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, एआरटी केंद्र, आयसीटीसी केंद्र, तसेच अशासकिय संस्था प्रकल्प लिंक वर्कर स्किम, मायग्रेट आयएसआरएसडी सेतू चॅरीटेबल ट्रस्ट या सर्वांचा सहभाग होता.
याप्रसंगी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रताप घोडके सर यांनी आतंरराष्ट्रीय युवा दिनाचे घोष वाक्य “Intergenerational Solidarity – ( पिढीजात एकात्मता आपल्या मुलांसाठी एक चांगले जग तयार करणे) या बाबत सर्व उपस्थितांना माहिती देऊन दिनांक 12ऑगस्ट 2022ते 26 ऑगस्ट 2022या कालावधीमध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामिण रुग्णालय यांच्याकडून पंधरवाडयाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये युवक युवतींनी मोठयाप्रमाणात सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

About kalakridadoot

Check Also

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा ; निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInनवी दिल्ली, 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!