Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

आंबा पचकन् पिचकारी मारते.. $$$ कविसंमेलन: सामाजिक वास्तव, व्यथा अन् दिशा

जालना (प्रतिनिधी) :
” पुढच्या वेळी चांगली सर्व्हिस दिली तर, बक्षीस देईल
असं प्रत्येक वेळी म्हणणारा
तो आठवला की….
आंबा पचकन् पिचकारी मारते पानांची
अंबाबाई कडे जाणाऱ्या देवळाच्या वाटेवर….! “
श्रध्देच्या ठिकाणी होणारी कुकर्म, तरुणाईच्या डोक्यात बिंबवली जाणारी हिंसा, गर्भातील स्ञी अर्भकाची गांधारी होण्याची इच्छा,समाजाने नाकारलेला वर्गात क्रांतीची मशाल घेऊन नवीन आशावादाने  जगण्याची धडपड, अशा सामाजिक वास्तवांवर आधारित बहारदार रचनांनी कवितेचा पाडव्याचे  कविसंमेलन चांगलेच गाजले.
जे .ई.एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात ” दु; खी ” राज्य काव्य पुरस्कार व पुस्तक प्रकाशन सोहळ्या नंतर झालेल्या निमंत्रित कवींच्या कवी संमेलनात रेखा बैजल, प्रज्ञा पवार, डॉ संजीवनी तडेगावकर, दिशा पिंकी शेख, संजय चौधरी यांनी विविध विषयांवर आधारित एकापेक्षा एक सुरस रचना सादर केल्या. त्यांना रसिकांनी तेव्हढाच उत्तम प्रतिसाद दिला.
 पती,मुलं हेच स्त्री साठी खरे दागिने असून तिला दुसरी अपेक्षा नसते तीच्या मनांतील दागिन्यांची वर्णन करणारी कविता संजय चौधरी ( नाशिक) यांनी सादर केली.
आई म्हणाली
” बछड्या तूच मार गळ्याला घट्ट मिठी, तुझ्या कोवळ्या हातांनी अन् धडधडू दे इवलसं ऱ्हदय… माझ्या वक्षांवर
या पेक्षा मौल्यवान नाही बरं दुसरा कुठला दागिना .”
 मातेची ममता, वात्सल्य प्रत्येकाने जीवनभर जपावी अशी अपेक्षा कवितेतून व्यक्त केली.
विद्रोही परंपरेच्या वारसदार डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आजच्या पिढ्यांमध्ये धर्म, द्वेष, हिंसा पसरविण्यासाठी नियोजन बध्द रितीने कार्य सुरू आहे. तरी सत्य वाचविण्यासाठी एका वर्गाची सुरू असलेली धडपड, प्रसंगी बळी पडणे अशा वास्तवावर आधारित रचना डॉ . प्रज्ञा दया पवार यांनी सादर केली.
” लहान मुले, तरूणांच्या तरतरीत मेंदूत लाखो करोडो प्रश्न कारंजा सारखे उसळतात .
त्यांना बंदुका, लाठ्या-काठ्या , हिंसेचे आकर्षक पासवर्ड….! “
एकीकडे असे वातावरण असतांना लेखनातून आशावाद व्यक्त करणारी रचनेने झणझणीत वास्तव उलगडले.
भावकवयित्री डॉ संजीवनी तडेगावकर यांनी
” अस्वस्थ किनार्‍यावरती या मुजोर झाल्या लाटा
देहाच्या पागोळीतून शिरशिरतो ओला काटा… “
पती- पत्नी, प्रियकर – प्रियसीच्या नात्यातील ओलावा व्यक्त करणारी कविता सादर करत वेगळे चैतन्य निर्माण केले.
स्त्री जन्मापूर्वी पासून तिच्या वाट्याला येणारे दु:ख, भोगाव्या लागणाऱ्या यातना यातून स्ञी म्हणजे केवळ उपयोगासाठी पृथ्वीवर अवतरली. असा गर्भीत आशय असलेली ‘गर्भस्थ’  रचना रेखा बैजल यांनी सादर केली.
” आता मलाही वाटतं
आपण गांधारी व्हावं
आणि शंभर कुंभामध्ये हे आजन्मी अंश गर्भस्थ करावे “
या रचनेने उपस्थितांना अंतर्मुख केले.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कविसंमेलनात सहभागी कवींनी एकापेक्षा एक सुरस रचना सादर केल्या
पाडव्याच्या परंपरेनुसार खचाखच भरलेल्या
रसिकांनी शेवट पर्यंत थांबून उदंड प्रतिसाद दिला.
संजय चौधरी यांनी स्वतः रचलेली
” आभाराचे भार कशाला… “
या कवितेने कविसंमेलनाचा समारोप झाला.
पंडितराव तडेगावकर यांनी शेवटी आभार मानले. मराठवाड्यासह विदर्भातील साहित्य रसिकांनी सुध्दा हजेरी लावत कार्यक्रमाचा अस्वाद घेतला.

About kalakridadoot

Check Also

“पुन्हा तुझ्यासाठी” चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInवानवडी,पुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित पुस्तक प्रकाशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!