Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

आज `मी महात्मा फुले बोलतोय’ हा एकपात्री नाट्यप्रयोग

जालना, प्रतिनिधी -जालना येथील महात्मा फुले विचार मंचच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त्त १० एप्रिल रविवार आज रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे येथील सिनेअभिने, नटश्रेष्ठ कुमार आहेर यांच्या `मी महात्मा फुले बोलतोय’ या एकपाञी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम टाऊन हाँल,जुना जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेङकर सभागृह येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ.संजय राख (दिपक हॉस्पिटल) व भाऊसाहेब जाधव  (उपविभागीय अधिकारी,परतूर) यांची उपस्थिती राहणार आहे.गेल्या बारा वर्षापासून महाराष्ट्रातील नामवंतांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वर्षी विशेष  म्हणजे प्रथमच कुमार आहेर यांच्या `मी महात्मा फुले बोलतोय’ या एकपाञी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आलेले  आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष संतोष रासवे, उपाध्यक्ष विलास जमधङे, सचिव एकनाथ मुळे, सहसचिव धर्मा इंगळे, कोषाध्यक्ष  सुनिल साबळे, प्रा.डॉ. विजय राजाळे, प्रा.राजकुमार बुलबुले, एकनाथ गायकवाङ, रवि तारो, प्रा.डॉ.विजय केंदळे, अनिल वाघमारे, सतिश तायडे, अशोक खरात, विजय गाढवे पाटील, साहेबराव जैवळ, मुंकुद खरात, गणेश तांबेकर, संजीवकुमार  खंङारे, शांतीलाल गोरे, संतोष जमधडे, ज्ञानेश्वर गाढवे,अमृत तारो,शिवानंद खरात यांच्यासह महात्मा फुले विचार मंचच्या सर्व सदस्यांनी केले आहे.

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!