Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

उपेक्षित लोक कलावंताच्या मागण्याबाबत आमरण उपोषण

जालना/प्रतिनीधी – उपेक्षीत लोक कलावंताच्या विविध मागण्याकरीता जि.प. कार्यालय जालना येथे लोक कलावंताच्या वतीने आमरण उपोषणास दि. 06/06/2023 रोजी पासुन सुरू करण्यात आले आहे. यावेळी कलावंताच्या वतीने निवेदनही सादर करण्यात आले, निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की,
बर्‍याच कालावधीपासून लोक कलावंत उपेक्षित आहेत. त्यांनी उपेक्षित राहवे का, आम्ही लोक कलावंत महाराष्ट्राची संस्कृती जतन करून स्वःताचे कुटुबाचे उदर निर्वाह उपेक्षित राहूनच भागवीत आहोत. महाराष्ट्र शासनाने या लोक कलावंत मंडळीचे सूक्ष्म दृष्टीने अवलोकन करून त्यांना माणूस म्हणुन जगण्याइतपत तरी सर करावे. जेणे करून लोक कलावंताची समाजात कुचंबना होणार नाही. त्या दृष्टीने त्याचा खालील सहानुभूती पूर्वक विचार व्हावा अशी कळकळीची विनती प्रशासनास करण्यात आली आहे.
लोक कलावंताच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत – उपेक्षित कलावंताच्या मानधना मध्ये अकरा हजार रुपये याप्रमाणे मासीक वाढ करण्यात यावी, मानधन प्रस्तावसाठी लागणारे उत्पन्न प्रमाणपत्रसाठी मर्यादा 48000 वरून दिड लाखापर्यंत करावी, कलावंताच्या विधवा पत्नीस वारसदार प्रमाणपत्र मा. तहसीलदार साहेबांनी त्वरित द्यावे, व वारस प्रस्ताव हा दोन महिन्यात पूर्णता मंजूर करून लाभार्थ्यास मानधन अदा करावे, कोरोना काळातील शासनाने 5000 रुपये पॅकेजमंजूर केलेल्या 125 इष्टपैकी 16 कलावंताना दिली नाही, तरी ती रक्कम प्राप्त करून देण्यात यावी, सन 2019-20 व 2020-22 वर्षासाठी मानधन वाढीतील 14 कलावंताना अद्यापही 1 रुपया मिळाला नाही. त्यांना त्वरित मानधन प्राप्त करून देण्याची कृपा करावी, मानधन प्रस्ताव या वर्षांचे निकाली काढून महिला व अपंग इष्टांक पूर्णत करावा, निवड समितीने मुळ कागदपत्रे तपासून निकषा प्रमाणे प्रस्ताव निकाली काढावेत अन्यथा आम्हाला न्याय मंदिराकडे न्याय मागावा लागेल., कलावंताना महाराष्ट्राभर मोफत बस प्रवास सवलत देण्यात यावी, लोककलावंतीत वाघ्या मुरळी ह्या प्रकारात तरुण पुरुष कलावंत स्त्री वेश परिधान करून मुरुळी नृत्य करतात अशा कलावंताना मानधन प्रस्तावासाठी वयाची अट शिथील करून प्रस्तावामध्ये राखीव जागा देण्यात यावी.
सदर निवेदनावर शा. राम शंकर घोडके, ज्ञानेश्वर विठ्ठल जगताप, सुधाकर विश्वनाथ डहाळे, नाथ गोविंद शिंदे, शा.विजय रामचंद्र मघाडे, नारायण रेणुराव कुलकर्णी, गणेश शेलार, पांडुरंग गोंविदराव पवार, नारायण वाघमारे, अन्शिराम कन्हेरकर, पुंजाराम वाघमारे, रमेश पांडुरंग खरात, शा. विनायक सवडे, शा.गजानन मोरे, सुभाषराव मांगडे, सर्जेराव रामभाऊ मुळक, उत्तम आनंदा मगरे, अनिल भावराव गायकवाड, अमरसिंग रामजी गरडवाल, अशोक शंकरराव सुरसे, आसाराम रामभाऊ भेरे, एकनाथ कोणाजी संसारे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!