Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

कवी, लेखक ,कलावंत , खेळाडू , राजकीय नेते यासमवेत समवेत रंगली काव्य मैफिल

पुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)
नाट्य चित्र कला अकादमी पुणे अव्दैत क्रिडा केंद्र व राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम कवी लेखक कलावंत खेळाडू पत्रकार यांचे वाढदिवस दरवर्षी साजरा करणारी वरील एकमेव संस्था आहे.
लेखक गिरीश देशपांडे लिखित माझा नाट्य प्रवास या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य प्रा.सूर्यकांत नामगुडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे डॉ मदन कोठुळे , राजेंद्र आलमखाने, अभिनय मोरे ,कवयित्री मीनल बाठे, युवराज दिसले दिग्दर्शक निर्माते सूर्यकांत तिवडे ,वि रा .मिश्रा हे मान्यवर उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशन सोहळा या पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन लोककवी सीताराम नरके यांनी केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत तिवडे यांनी केले. डॉ मदन कोठुळे, राजेंद्र आलमखाने ,अभिनय मोरे गिरीश देशपांडे या सर्वांनी मनोगत व्यक्त केले.
वाढदिवसाचे उत्सवमूर्ती शरदचंद्र पवार साहेब, सीताराम नरके, चंद्रकांत जोगदंड, दीपक कुदळे, रूपाली अवचरे यांचे वाढदिवस याप्रसंगी साजरे करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी गझलकारा कवियत्री मीनल बाठे, प्रमुख पाहुणे किशोर टिळेकर, गझलकार कवी बाळासाहेब गिरी, सिनेअभिनेते जनाबापू पुणेकर होते. याचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी केले.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छतेचा संदेश देणारी रचना योगिता कोठेकर यांनी सादर केली. महाराष्ट्र माझा किसन म्हसे झेंडा एकतेचा संदेश देणारी रचना रमाकांत पडवळ यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. जीवनगाणे जीवन वळणावर छगन वाघचौरे, चहा प्रेमाने पहा लक्ष्मीदेवी रेड्डी, समाजाला जीवनभराची शिदोरी दिलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महती सांगणारी रचना अभिनेते गीतकार डॉ बळीराम ओहोळ यांनी सादर करून मान्यवरांची रसिकांची वाहवा मिळवली. मैत्रीचा सलोखा ओलावा जपणारी रचना मनासारखा ही गझल सादरीकरणा रसिक व सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. प्रेमगीत विनोद अष्टुळ, खाजगी नोकरी तानाजी शिंदे, वर नववधू मधुचंद्राच्या रात्रीचे वर्णन केले मंत्रमुग्ध केले जीवनाचा गुंता राहुल भोसले, प्रीतीचा सहारा दिनेश गायकवाड ,शृंगार रसात वाहणारा प्रेमकवी निरंजन ठणठणकर यांनी वातावरण संतमय करून टाकले. काय झाल काय झाल वय झालं सूर्यकांत नामगुडे, माणूसकी किशोर टिळेकर, समजूतीचा दाखला जनाबापू पुणेकर, चल सखे सीताराम नरके, भारला श्वास नवा रानकवी जगदीप वनशिव .गझलमय वातावरणात मीनल बाठे यांनी आपले मनोगत आणि काही रचना ऐकवल्या. कार्यक्रमाचा समारोप चंद्रकांत जोगदंड यांनी हिंदी रचना सादर करून वेगळाच माहोल तयार केला.

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!