Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

“घरोघरी तिरंगा” उपक्रमांतर्गत पीरकल्याण येथे भव्य मशाल रॅली संपन्न

महिलांसह गावकऱ्यांनी मशालफेरीद्वारेदिला एकात्मतेचा संदेश

प्रत्येक गावकऱ्याने आपल्या घरावरतिरंगा फडकवावा
— जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन
जालना,दि. 11 (जिमाका):- देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक देशाच्या विकासरुपी पक्षाची महिला व पुरुषहे दोन पंख आहेत. विकासाची गरुड भरारी अधिक मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी उमेदच्या माध्यमातूनमहिला सक्षमीकरणावर अधिक भर देण्यात येत आहे. “घरोघरी तिरंगा”उपक्रमांतर्गत प्रत्येकाला आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे भाग्य लाभले असुन तिरंग्याच्यासंहितेचे पालन करत प्रत्येक गावकऱ्याने दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावरतिरंगा फडकवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त“घरोघरी तिरंगा” उपक्रमांतर्गत पीरकल्याण गावातज्ञानदीप महिला ग्रामसंघ, उज्ज्वल ज्योतीग्रामसंघ, उमेद अभियान यांच्यावतीने बुधवारी रात्री मशाल फेरीचे आयोजन करण्यातआले होते. त्याप्रसंगी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधताना‍ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडबोलत होते.
कार्यक्रमास जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी मनुज जिंदल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विलास खिल्लारे,गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी, जिल्हा अभियान व्यवस्थापक शैलेश चौधरी, तालुका व्यवस्थापकगणेश तिडके, राजू राठोड, गिरीश पै, तालुका समन्वयक निलेश शिंदे, सरपंच शरीफा बी नाजीमोद्दीन शेख, उपसरपंच लताबाईबाबासाहेब भुतेकर, पंचायत समिती सदस्य कुशीवर्ताबाई शिंदे, प्रतापराव शिंदेआदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, भारतीयस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनकरत हे गौरवशाली पर्व अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरे करण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकालाआपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे भाग्य लाभले असुन याचा प्रत्येकाने अभिमान बाळगत मानानेआपल्या घरावर तिरंगा फडकवावा. तिरंगा फडकवतानात्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेत प्रत्येक नागरिकाने तिरंग्याच्या संहितेचेकाटेकोरपणे पालन करावे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविधउपक्रम राबविण्यात येत असुन जिल्ह्यात सर्वप्रथम मशालफेरीच्या आयोजनातून पीरकल्याणगावाने एकात्मतेचा संदेश दिल्याने सर्व गावकऱ्यांचे जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळीकौतुकही केले.
मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल म्हणाले, अनेक हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपल्या देशालास्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या बलिदानामुळेआज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. देशभक्तीचीजाज्वल्य भावना कायमस्वरुपी प्रत्येकाच्या मनात रहावी यासाठी भारतीय स्वातंत्र्यांच्याअमृत महोत्सवानिमित्त आयोजित उपक्रमात प्रत्येकाने सहभाग घेत घरोघरी तिरंगा उपक्रमामध्येप्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात प्रकल्प संचालक विलास खिल्लारेम्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उमेदमार्फत अनेकविध उपक्रमराबविण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या तालुक्यातीलआठ गावांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभा घेत मशालफेरी आयोजनाबरोबर जिल्ह्यातील 910 गावांमध्येमशालफेरीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मशालफेरीद्वारे दिला एकात्मतेचा संदेश


भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्तपीरकल्याण येथे ज्ञानदीप महिला ग्रामसंघ,उज्ज्वल ज्योती ग्रामसंघ, उमेद अभियान यांच्यावतीने आयोजित मशालफेरीमध्ये महिला, विद्यार्थी,विद्यार्थीनींसह गावकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. “हरघर तिरंगा”, “घरोघरी तिरंगा”, “भारत माता की जय” या घोषणांनी संपूर्णगाव दणाणून गेले होते. जिल्हाधिकारी डॉ. विजयराठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्यासह प्रत्येकाने हातामध्ये मशाल घेतसंपुर्ण गावात फिरुन एकात्मतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचेसंचलन श्री नागरे यांनी केले तर आभार ग्रामसंघाच्या अध्यक्षा संगीता शिंदे यांनी मानले.*******

About kalakridadoot

Check Also

शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवा – पोलिस अधीक्षक तुषार दोशी

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInकर्जत येथील राजुरेश्वर मध्ये ‘मी कसा घडलो’ कार्यक्रमात प्रतिपादन… अंबड/ प्रतिनिधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!