Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

चांदई ठोंबरी ते सिंगापूर – एक युवकांचा अविस्मरणीय प्रवास….

प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील चांदई ठोंबरी या गावातील भूमिपुत्र देवा गाडेकर याचा मुख्य भूमिकेत असलेला मराठी चित्रपट वल्ली हा सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवण्यात येणार आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी त्याला उत्कृष्ट अभिनेता यासाठी देखील नामांकन मिळालं आहे. देवा गाडेकर हा चांदई ठोंबरी ते सिंगापूर प्रवास करणारा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. तो बऱ्याच वर्षांपासून नाटक आणि सिनेमा या क्षेत्रांशी कार्यरत आहे. आई वडील दोघेही शेतकरी आहे.वल्ली या सिनेमाचं विशेष हे की याचं शूटिंग त्याच्याच गावात म्हणजे चांदई ठोंबरी ता.भोकरदन या ठिकाणी झालं आहे. या गोष्टीचा गावकऱ्यांना अतिशय आनंद होत आहे. .मराठवाड्यातील स्थानिक कलाकारांचा मोठा भाग असलेला वल्ली हा चित्रपट.आपल्या सगळ्यांच्या आनंदात आणखी एक भर घालणारी ही बातमी आहे.
     देवा सखाराम गाडेकर याने आपलं शालेय शिक्षण चांदई ठोंबरी आणि केळीगव्हाण इथं पूर्ण केलं, नंतर जालना इथं ITI करून काही काळ त्याने जाॅब ही केला.
नंतर तो नाट्यक्षेत्राकडे वळला.त्याने नाटकात आपलं B.A in theatre संभाजीनगर च्या एस. बी. महाविद्यालयातुन केलं व पुढे M. A in theatre साठी तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ललित कला केंद्र इथं गेला.
देवा गाडेकर याला आजही मुख्य हंगामात शेती च्या कामासाठी जावं लागतं.त्याला या कामात खुप समाधान आणि सुख वाटतं,तो म्हणतो की हे काम मला नेहमी नवी चेतना देत राहतं, माझ्या अभिनयासाठी, या माती सोबत वेगळी अनुभूती येते आणि उत्तम चिंतन मनन होत राहतं. मी संभाजीनगर ते पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र, या जागेने, इथल्या शिक्षकांनी अभिनयाचा एक विराट स्वरुप समोर मांडलं जसं की कृष्णाच्या मुखात यशोदेला दिसलं होतं, ही अतिशयोक्ती वाटेल पण हे आसच आहे.

आता ह्या वावटळीत उडी घेतलीच आहे तर, काही छोटं मोठं समाधान पुरेस राहत नाही, मग सिनेमा हे एक माध्यम आहे जिथं दिग्दर्शक लोकांशी ह्या सगळी घसट होऊ लागली आणि आता वल्ली हा सिनेमा करतांना माझ्या नकळत माझी सगळी ताकत सगळे विचार, अनुभव या भोवती आले, आणि मी केलं आसं न म्हणता ते काम होत गेलं, यासाठी दिग्दर्शक मनोज शिंदे सर ही त्या विचाराशीच शीच नातं सांगणारे होते, आणि त्यांच्या या सोबतीने आज वल्ली हा सिनेमा जागतीक पातळीवर ऊभा आहे.पुढे देवा आपल्या साकारलेल्या पात्राविषयी असं म्हणतो की, वल्ली हे पात्र माझ्या शक्यतांना डिवचणारं होतं, मी खूप मार्गाने त्याला पकडायचं ठरवलं पण ते तिथं नसायच, थोडासा चकवा व्हायचा माझ्या सोबत, पण ते होतं त्याच्या गाण्यांमध्ये दडलेलं, म्हणून ते गाण्यातून खुप सुंदर ऊभ राहतं, ह्या भुमिकेने नटाला दाखवलेला रस्ता भारी आहे.
सोबतच या पात्रा साठी उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला नामांकन मिळालं आहे . राष्ट्रीय पातळीवरील ऊत्कृष्ट अभिनेत्या सोबत stage share करतांना प्रचंड आनंद होत आहे आणि संपूर्ण देशातुन फक्त आपणच आसणं, हे आभिमाना सोबतच craft चा विजय आहे.
शेती जी नेहमी् जिवंत करुन, एक ऊर्जा भरते, तितकच ललित कला केंद्राने ही दिलंय, सोबत मनोज शिंदे यांनी जो विश्वास दाखवला सर्वांचा मी नेहमीच ऋणी आसेल.त्याचबरोबर माझ्या गावातील लोकं, त्यांचं सहकार्य यांचा पण एक सिंहाचा वाटा आहे या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यामुळे त्यांचे हे ऋण मी विसरू शकत नाही. आणि मी सिंगापूर ला जागतिक स्तरावर माझ्यासोबत माझ्या गावाला,तिथल्या संस्कृतीला,व भाषेला घेऊन जातोय या गोष्टीचा मला जास्त अभिमान आहे.
कथेचा नायक वल्ली, जो जोगता परंपरेचा अनुयायी आहे- प्राथमिक पुरुषाच्या शरीरात जन्मलेला आणि बहुरूपाने स्वतःला स्त्री म्हणून दर्शवणारा व्यक्ती.
या दशकभरात, वल्लीला जाणवते की त्याचा खरा पुरुषार्थ अत्यंत उपेक्षित राहीलाय.
शारिरीक हल्ले, सामाजिक उपहास आणि सार्वजनिक छळ सहन करत, वल्ली परंपरेच्या बंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतो आणि शहरी जीवनातील कठोर वास्तवांना तोंड देण्यासाठी तारासोबत प्रवास सुरू करतो.

सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (@sgiffest) मध्‍ये ‘वल्‍ली’ या सिनेमाचा जागतिक प्रीमियर नंतर,
29व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023 ( @kiff_official ) मध्ये मुख्य स्पर्धेसाठी देखील ‘वल्ली’ची निवड झाली आहे आणि त्याच्या राष्ट्रीय प्रीमियरसाठी तयार आहे, पुढे ‘वल्ली’ ची 9व्या अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 ( @aeiffest ) मध्ये भारतीय चित्रपट स्पर्धेत अधिकृत निवड झाली आहे.
देवा गाडेकर याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासासाठी मराठवाड्यातील नाट्य व चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर सह गावकरी यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!