जालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापिका अख्तर जहाँ कुरैशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली.
वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवले. मुख्याध्यापकाची भूमिका मारिया आरिफ शेख यांनी,पोषण आहार मदतनीसची भूमिका शाहीन शौकत सय्यद यांनी ,सेविकेची भूमिका आयशा अकील शेख यांनी पार पाडली.अदीबा फारुक शेख,जैद अलीम शेख,जोएब शफीक शेख,मुजाहिद अलीम शेख,आजम फेरोज शेख,उम्मेकुलसुम मतीन कुरेशी,हबीब इस्माईल शेख,आलिया वासेफ सय्यद,सादिया वहाब शेख,फिजा फारुक शेख यांनी अध्यापनाचे कार्य केले. शिक्षिका विद्या जगनाडे व शिरीन समिना,शाह फैसल यांनी अध्यापनाचे निरीक्षण केले.
आपले अनुभव कथन करताना छात्र शिक्षक म्हणाले की अध्यापनाचे काम करतांना विद्यार्थ्यांचे प्रतिसाद मिळणे म्हत्वाचे आहे याची जाणीव आम्हाला झाली. छात्र शिक्षकांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन गौरविण्यातआले.