Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जालन्यात एआयएमआयएमच्यावतीने भव्य तिरंगा रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे देश मजबुत- शेख माजेद

जालना । प्रतिनिधी – भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या औचित्याने जालना शहरात एमआयएम पक्षाच्यावतीने सोमवार (दि 15) रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीत सुमारे पाचशे दुचाकींचा सहभाग होता. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देश मजबूत असल्याचे प्रतिपादन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी यावेळी केले. हिंदुस्थान झिंदाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद अशा घोषणांनी शहर दाणाणून गेले.
15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्तने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. एमआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर खा. असद्दोदीन औवेसी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांच्या सूचनेनूसार शहरात एआयएमआयम पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेल्या तिरंगा मोटरसायकल रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीत सुमारे पाचशे दुचाकी सहभागी झाल्या होत्या. दुचाकीवर स्वार सर्वांच्या हाथी तिरंगा ध्वज होता. रॅली दरम्यान हिंदुस्थान झिंदाबाद च्या घोषणांनी शहर दाणाणून गेले. प्रसंगी शेख माजेद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्व भारतीयांना अधिकार प्राप्त झाले आहेत. आजची ही भव्य रॅली देखील त्यांच्या संविधानामुळे शक्य झाली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या संविधानाने देश आज मजबूत असल्याचेही शेख माजेद यांनी यावेळी सांगतले.
या रॅलीची सुरवात छत्रपती संभाजी महाराज उद्यान (मोतीबाग) येथून करण्यात आली. मोतीबाग पासून निघालेली रॅली गांधीचमन मार्गे मंमादेवी- मामा चौक- टांगा स्टॅण्ड – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – मंगळबाजार- पाणीवेस – गरिबशहा बाजार- रेल्वे स्टेशन रोड ते शहीद टिपू सुलतान चौकात रॅलीचा राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. दरम्यान, शेख माजेद यांचे ठिकठिकाणी स्वागत व अभिनंदन करण्यात आले. या रॅलीत पक्षाचे युवा शहराध्यक्ष जोहेब अन्सारी, सोशल मिडीया शहराध्यक्ष शोहेब खान,  समी बागवान, अरशद शेख, फसियोद्दीन अन्सारी, सय्यद इस्माईल, नुमान बागवान, इकराम शेख, मुज्जु खान, शेख शफीक, आवेस शेख, हामीद बागवान यांच्यासह एमआयएमच्या जिल्हा-शहरातील पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

About kalakridadoot

Check Also

“पुन्हा तुझ्यासाठी” चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInवानवडी,पुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित पुस्तक प्रकाशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!