Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात

बुद्धीच्या विकासासाठी तायक्वांदोसारखे क्रीडा प्रकार अत्यावश्यक – अरविंद देशमुख

जालना/प्रतिनिधी – शिक्षणाबरोबरच बुद्धीच्या विकासासाठी तायक्वांदोसारखे क्रीडा प्रकार अत्यावश्यक आहेत, असे प्रतिपादन तायक्वांदो असोसिएशन जालना जिल्हा अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी येथे केले.

मैदानी खेळ खेळून स्वतःला व बुद्धीला विकसित करावे – गाजरे
     यावेळी संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष संतोष गाजरे म्हणाले की, आजकालच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल ऑनलाईन गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळून स्वतःला व बुद्धीला विकसित करावे. तायक्वांदोमुळे सर्वांग व्यायाम होतो. त्यामुळे सर्वांनी या खेळाकडे वळायला हवे असे ते म्हणाले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तायक्वांदो असोसिएशन जालना जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी तायक्वॉदो असोसिएशन जालना जिल्हा चे अध्यक्ष अरविंद देशमुख यांच्याहस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष संतोष गाजरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मार्गदर्शक संतोष वाबळे, संघटनेचे सचिव सचिन आर्य, तायक्वॉदो असोसिएशन जालना जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूळ, प्रवीण पाचपुले, फाईम खान, मयूर पिवळ ,सचिन गादेवाड, ज्ञानेश्वर मोरे, प्रतीक ढाकणे, शेख जावेद, प्रांजल पिवळ यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकपर भाषणात राष्ट्रीय पंच तथा संघटनेचे सचिव सचिन आर्य यांनी या स्पर्धेचा उद्देश विशद केला.
स्पर्धेत 75 खेळाडू सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रांजल पिवळ यांनी केले तर आभार सचिन आर्य यांनी मानले.

About kalakridadoot

Check Also

अमृता सोपान शिंदेला सुवर्णपदक

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedIn जालना/प्रतिनिधि :- दि 14 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!