जालना/प्रतिनिधि – जालना येथून जवळच असलेल्या खरपुडी येथे क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना, जालना जिल्हा मल्लखांब असोसिएशन व आमची शाळा गुरुकुल निवासी माध्यमिक विद्यालय खरपुडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जालना जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष गणेश दादा सुपारकर ज्येष्ठ समाजसेवक श्री अरुणरावजी भिसे, श्री भिकूशेटजी इंदानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत कोळकर, जिल्हा मल्लखांब संघटनेचे सचिव श्री पाटेकर बी एस, जिल्हा मल्लखांब संघटनेचे मल्लखांब प्रशिक्षक ॲड राहुल सुपारकर, नवभारत विद्यालयाचे मल्लखांब प्रशिक्षक श्री भानुसे व्ही जी, पार्थ सैनिकी शाळेचे मल्लखांब प्रशिक्षक श्री ढवळे सर, मल्लखांब प्रशिक्षक श्री ढाकणे सर ,रेणुकाई माध्यमिक विद्यालयाच्या मल्लखांब प्रशिक्षिका देशमुख मॅडम सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मल्लखांब प्रशिक्षक श्री काकडे आदर्श विद्यालयाचे मल्लखांब प्रशिक्षक श्री पाटील सर, श्री ज्ञानेश्वर हिंगे, श्री हनुमंत पाटील, श्री अनिल नागवे ,श्री सिद्धार्थ रगडे , मयूर मांगडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वैभव भानुसे यांनी केले तर आभार श्री हनुमंत पाटील यांनी मानले
