4 थ्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयेाजन दिनांक 05 ते 14 फेब्रूवारी 2022 य कालावधीत हरियाणा या
ठिकाणी निश्चित झालेले आहे. सदर स्पर्धेचे /निवड चाचण्याचे आयोजन 18 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात
करण्यात येणार असून सदर स्पर्धेसाठी राज्याचे प्रतिनिधीत्व संघ निवडण्याकामी खो –खो खेळाच्या जालना जिल्हा
स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे करण्यात आलेले
होते.
जिल्हयातील 3 मुले 3 मुली संघानी सहभाग नोंदविला असून सदर जिल्हास्तर खो-खो स्पर्धा व निवड
चाचण्याचे उद्घाटन मा. श्रीकांत भुजबळ, तहसिलदार, जालना यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी मा. सुशिल
सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी, जालना, सुहासिनी देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना, प्रा.वाहेद पटेल,
तालुका क्रीडा संयोजक, जाफ्राबाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर स्पर्धेचे प्रस्तावीक सुहासिनी देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी केले तर मा. श्रीकांत
भुजबळ, तहसिलदार यांनी खेळाडूंना शुभेच्छा पर मार्गदर्शन करतांना खेळाडूचा प्रमाणिकपणा व सातत्य़ हे जिवनात
संघर्ष करण्याचे शिकविते, जिंकण्यासाठी खेळा, हार पचविण्याची क्षमता विकसीत करणे, तसेच दैनंदिन जीवनात
खेळाचे महत्व व व्यायाम याविषयी मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांचे जिल्हा क्रीडा अधिकारी जालना यांनी बुके देऊन
स्वागत केले.
सदर स्पर्धेसाठी पंच व निवड समिती सदस्य़ म्हणून राष्ट्रीय खेळाडू मधूकरराव अंभोरे, सेलगांव, शरद बांडे,
प्रल्हाद काळे, सचिन दोरके, सचिन मोहिते इत्यादीनी महत्वपुर्ण कामगिरी केली.
सदर जिल्हास्तर स्पर्धा आयोजनासाठी क्रीडा कार्यालयाचे संतोष वाबळे, महंमद शेख क्रीडा मार्गदर्शक, रेखा
परदेशी, क्रीडा अधिकारी, संतोष प्रसाद, वरिष्ठ लिपीक, सोपान शिंदे, रमेश वारे, हारूण शेख, राधा कांबळे यांनी परिश्रम घेतले.