Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जिल्हास्तर जवाहरलाल नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धा

महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा क्रीडा अधिकारी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धेचे आयोजन दि. 12 ते 13 ऑगस्ट 2022 या कालावधीत एस.आर.पी.एफ. बल गट क्र. 3 येथे करण्यात येत आहे. सर्व शाळांना आवाहन करण्यात येत आहे की, जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा.


या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्म तारखेनुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
15 वर्षाआतील मुले (सब ज्युनिअर), दि.1 नोव्हेंबर 2007 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा,17 वर्षाआतील मुले (ज्युनिअर) ), दि.1 नोव्हेंबर 2007 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूकडे जन्म तारीख दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट असणे आवश्यक आहे. जिल्हास्तर स्पर्धेची प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख दि. 11 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे जमा करावे. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक महंमद शेख, 8788360313, सोपान शिंदे 9404549575 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-*-

About kalakridadoot

Check Also

जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा खरपुडी येथे उत्साहात संपन्न

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधि – जालना येथून जवळच असलेल्या खरपुडी येथे क्रीडा व युवक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!