Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जिल्हा कारागृहात प्रबोधन, सांस्कृतिक व समुपदेशनात्मक कार्यक्रम

वर्धा, दि.१४ : सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदिंसाठी “जीवन गाणे गातच जावे” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समुपदेशन, प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमातून सदर कार्यक्रम सादर करण्यात आला.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी कारागृहाचे प्रभारी अधीक्षक नितीन क्षीरसागर, तुरंगाधिकारी संघमित्रा शेळके, व्हॉइस आर्टिस्ट व संवाद तज्ञ सचिन घोडे, योगशिक्षक दिलीप वाकडे, शाहीर डॉ.शिवाजी वाघमारे उपस्थित होते.
‘वंदे मातरम’ या गीताने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. न्यायाधीश विवेक देशमुख यांनी या कार्यक्रमातून नुसता आनंद नाही तर जीवनाला दिशा देखील मिळू शकते, यात केवळ मनोरंजन नाही तर जीवनात उपयोगी पडेल असे प्रबोधन सुद्धा आहे, असे सांगितले.
प्रभारी अधीक्षक नितीन क्षिरसागर यांनी उपस्थित बंदींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आणि जीवनात आपल्याला सुधार करण्याचे अनेक मार्ग मिळतात आणि त्यासाठी हे प्रबोधन निर्णायक ठरते, असे मत व्यक्त केले.
बंदिवान बांधवांकरीता आयोजित या कार्यक्रमात, महाराष्ट्राच्या लोककलेचे डॉ. शिवाजी वाघमारे यांनी आपल्या उत्कृष्ट कलेद्वारे बंदींना सदविचार, सदप्रवृत्ती, आदर्श जीवनशैली यांचे दाखले विविध शाहिरीमधून सादर करत प्रबोधन केले, दिलीप वाकडे यांनी दैनंदिन जीवनशैलीत योगाचे महत्व सांगितले. सचिन घोडे यांनी संवाद कौशल्याचे महत्व सांगितले.
यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये सप्तरंग संगीत कलावृंद वर्धेचे गायक आनंद निधेकर, गायिका स्वाती पोकळे, निवेदक दिलीप मेने, स्वप्नील कावळे, चारू साळवे, रवींद्र झाडे यांचा समावेश होता. या चमुने देशभक्तीपर विविध गिते सादर केली. कार्यक्रमाचे संचालन उज्वला घोडे यांनी केले तर आभार संघमित्रा शेळके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुरुंगाधिकारी सुहास नागमोते, हवालदार संजय श्रीवास, सय्यद सौदागर, अमित कारटकर, आशुतोष बोंडे, शरद सरसरे, प्रमोद पाहाडे, गिरीश निमकर, सदानंद ठोकळ, विजय मिसाळ व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
0000000

About kalakridadoot

Check Also

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा ; निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInनवी दिल्ली, 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!