Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

ज्युनिअर राज्यस्तरीय सेपकटकरॉ स्पर्धेत नांदेडचा मुलाचा संघास विजेते पद तर मुलीच्या संघास उपविजेतेपद

प्रतिनिधि- महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशनच्या मान्यतेने व अवधेश क्रीडा मंडळ व न्यू सेपक टकरॉ असोसिएशन, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने २५वी महाराष्ट्र राज्य जूनियर राज्यस्तरीय सेपकटाकरॉ स्पर्धा दिनांक 17 ते 19 जानेवारी वर्धा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नांदेड जिल्हा च्या मुलाच्या संघाने सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत नांदेड जिल्ह्याच्या संघाने अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करत टीम इव्हेंट मध्ये सुवर्ण, रेगु इव्हेंट मध्ये सुवर्ण आणि डबल इव्हेंट मध्ये सुवर्ण पदक प्राप्त करून 25 वी ज्युनियर राज्यस्तरीय सेपकटाकरॉ स्पर्धेचे विजेतेपद व उपविजेतेपद पटकावून जिल्ह्याचे नावलौकिक केले. नांदेड जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. मुलांच्या विजयी संघात क्षितीज सूर्यवंशी (कर्णधार) रोहित सूर्यवंशी,सुदेश कांबळे असंग जोंधळे, आर्यन केशेट्टीवार, सक्षम कुपटीकर,वेदांत डासे, वेदांत सूर्यवंशी, रोहन फड, पार्थ तांदळे ,मयूर वाकडे , सोमनाथ धुमाळे, श्रीनिवास शिंदे,विशाल फुलारी तर मुलीच्या संघात आरती ठाकूर (कर्णधार) श्रद्धा अवस्थी, सृष्टी नरवाडे,प्रशंसा वाडीकर, श्रेया गच्चे, सृष्टी जंगीलवाड, काशिणी कुपटीकर, अंकिता जाधव,रक्षीता बकवाड, पलकक्षा येरेकर, तेजस्विनी काळे,सर्व यशस्वी खेळाडूंना रविकुमार बकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे विजयी खेळाडूंचे महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशनचे अध्यक्ष विपीनभाई कामदार , राज्य संघटनेचे सचिव डॉ योगेंद्र पांडे कोषाध्यक्ष डॉ. ललित जिवानी, राज्य संघटनेचे अमृता पांडे, नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, नांदेड जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीणकुमार कुपटीकर, वर्धा जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. विनय मुन परभणी जिल्हा संघटनेचे सचिव गणेश माळवे, इक्बाल मिर्झा सर आदींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

…………..
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करून सहकार्य करावे ही नम्र विनंती

आपला विश्वासू
दिलीप सूर्यवंशी
प्रसिध्दी प्रमुख

About kalakridadoot

Check Also

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत पार्थ सैनिकी शाळेचे घवघवीत यश

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/ प्रतिनिधी-शालेय शिक्षण व क्रीडा विभाग युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!