Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

तंदुरुस्तीसाठी तायक्वांदोसारखे क्रीडा प्रकार आवश्यक-डॉ.पाटील

खेळामुळे बुद्धिमत्तेला चालना मिळते- डॉ. लाखे

खेळाडूंना पोलीस खाते, शासकीय सेवेत विशेष संधी – पीआय शिंदे
अध्यक्षीय भाषणात पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे म्हणाले की, तायक्वांदो हा खेळ कोरियन मार्शल आर्ट असून, या खेळात प्राविण्य प्राप्त केल्यास पोलीस खात्यासह विविध शासकीय सेवेमध्ये खेळाडूंना विशेष संधी दिले जाते. म्हणून या खेळाकडे खेळ म्हणून पाहण्यापेक्षा करिअर म्हणून सुद्धा बघावे व तायक्वांदोच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव लौकिक करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जालना/प्रतिनिधी – निरोगी सुदृढ व तणावमुक्त आनंदी जीवन जगण्यासाठी तायक्वांदोसारखे क्रीडाप्रकार अवगत केल्यास निश्चितच लाभ होतो, असे प्रतिपादन जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र पाटील यांनी येथे केले.
जय बजरंग फाउंडेशन, जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व मराठा महासंघाचा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन आज बुधवार दि. 1 मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्याधर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ओजस हॉस्पिटलचे संचालक डॉ. क्रांतीसिंग लाखे पाटील, कदिम जालना ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर, जय बजरंग फाउंडेशनचे उपाध्यक्ष विनोद राऊत, ॲड. कल्पना त्रिभुवन, धनसिंग सूर्यवंशी, अशोक पडूळ, वैशाली सरदार, ॲड. शैलेश देशमुख, दीपक देशपांडे, सुभाष चव्हाण, राष्ट्रीय पंच सचिन आर्य, जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख आदींची उपस्थिती होत. या स्पर्धेत जिल्हाभरातून 100 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
यावेळी डॉ. लाखे पाटील म्हणाले की, देव करो कुठल्याही खेळाडूला दुखापत होऊ नये. परंतु, खेळ म्हटल्यावर नैसर्गिकरित्या काही ना काही दुखापत होते. असे घडल्यास गुणवंत खेळाडूसाठी ओजस हॉस्पिटलची दारे सदैव खुली आहेत. त्याचबरोबर दवाखान्यापासून दूर राहायचे असेल, बुद्धिमत्तेला चालना द्यायची असेल, स्वतःला विकसित करायचे असेल तर कुठल्या ना कुठल्या क्रीडा प्रकारात सातत्याने सराव करणे हे प्रत्येकाच्या जीवनात अनिवार्य आहे. तरच तुम्ही कुठल्याही क्षेत्रांमध्ये जा, निश्चित यशस्वी व्हाल, असा विश्वास डॉ. लाखे यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकपर भासणात अरविंद देशमुख यांनी युवा पिढी सोशल मीडियात मग्न आहे. अशा परिस्थितीत युवापिढीला मैदानाकडे आकर्षित करण्याची गरज आहे. तायक्वांदो खेळाच्या माध्यमातून सर्वांग व्यायाम होतो. खेळामुळे बुद्धीही तल्लख बनते. त्यामुळे प्रत्येकाने कोणत्या का होईना क्रीडा प्रकाराचा छंद जोपासावा, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.
यावेळी श्री. विद्याधर, सौ. वैशाली सरदार , पोलीस निरीक्षक सय्यद, ॲड. त्रिभुवन यांचीही समायोचित भाषणे झाली. जय बजरंग फाउंडेशनचे अध्यक्ष विपुल राय यांच्या सहकार्याने ट्रॉफीज, प्रमाणपत्र व विजयी खेळाडूंना मेडल उपलब्ध करून देण्यात आले. काही कामानिमित्त ते बाहेर राज्यामध्ये असल्याने त्यांनी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत पंच म्हणून मयूर पिवळ, सचिन गादेवाड, दिव्या गायकवाड, वैष्णवी पळसकर, पवण झोल, सुजन हतागळे, प्रांजल पिवळ यांनी काम पाहिले.

छायाचित्र / नंदकिशोर शहाणे

About kalakridadoot

Check Also

योगासन स्पोर्ट्स स्पर्धेचे उद्घाटन

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedIn जालना, दि. २७- महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन तर्फे जालना जिल्हास्तरीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!