नागपूर : मॅजेन्टा आर्ट्स अँड एंटरटेनमेंटच्यावतीनं काल नागपुरातील ली-मेरिडिअनमध्ये ‘मिस आणि मिसेस इंडिया क्वीन ऑफ नेशन 2022 सीझन 2’ चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरी आणि अभिनेता अमन वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी नागपुरात ‘मिस आणि मिसेस इंडिया क्वीन ऑफ नेशन 2022’मध्ये सहभागी झालेल्यांचा आत्मविश्वास वाढवला.
सौंदर्य स्पर्धेचे उद्दिष्ट मोठं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला प्रोत्साहन देणं आणि नागपुरात एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा होता. जिथे त्यांना त्यांच्यातील छुपी प्रतिभा दाखवता येईल. त्याचबरोबर, “आज महिला शिक्षणाच्या क्षेत्रातसुद्धा आघाडीवर आहेत. आज पुरुषापेक्षा स्त्री मोठ्या पदावर कार्यरत आहे. फक्त चूल आणि मूल यापुरते स्त्रियांचे कार्यक्षेत्र मर्यादित नसून स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात आहे आणि तिने असायलाच हवे.” असा संदेश अभिनेत्री महिमा चौधरी हिने माहेर कट्ट्याला दिलाय.
संपूर्ण भारतातून 18 स्पर्धकांनी ‘मिस आणि मिसेस इंडिया क्वीन ऑफ नेशन 2022’ या स्पर्धेत भाग घेतला. सहभागी स्पर्धकांनी टॅलेंट राउंड, फिटनेस राऊंड, फोटो शूट, वैयक्तिक मुलाखत आणि रॅम्प वॉक केले. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.