Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित नाट्यछटा स्पर्धेत 800 स्पर्धकांचा सहभाग

प्राधिकरण- निगडी-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)
नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे पिंपरी-चिंचवड व निगडीमधील पाच विभागात घेण्यात आलेल्या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत यंदा 800 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेत विक्रम नोंदविला. यातून अंतिम फेरीत पोहोचलेल्या 151 जणांची अंतिम फेरी रविवारी झाली. सहा गटात झोलेल्या स्पर्धेत आयुष आफळे, मनस्वी अत्रे, मनस्वी देशपांडे, आराध्या हांडे, कृष्णा रत्नपारखी, नेहा खरे यांनी आपआपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मनोहर वाढोकार सभागृहात आयोजित करण्यात आला होता. रंगकर्मी मनोज डाळिंबकर आणि ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख प्राचार्य मनोज देवळेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त दिपाली निरगुडकर, पिंपरी विभाग स्पर्धा प्रमुख माधुरी ओक, मधुश्री कला मंचचे राजेंद्र बाबर व्यासपीठावर होते.
कलांमधून व्यक्तिमत्त्व विकास होत असल्याचे सांगून मनोज देवळेकर म्हणाले, आयुष्यातील ताणतणाव दूर करण्यासाठी कुठल्यातरी केलेत रमले पाहिजे. सर्व कलांमध्ये नाट्य हे सर्वात महत्त्वाचे अंग आहे.
मनोज डाळिंबकर म्हणाले, यश-अपयश याचा विचार न करता स्पर्धेत भाग घेणे महत्त्वाचे आहे. स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे सर्वचजण कलावंत होतील असे नाही तर कलांमुळे जागरूक नागरिक घडण्याचे काम निश्चित होईल.
प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीची माहिती देऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी नाट्यसंस्कार कला अकादमी प्रयत्नपूर्वक काम करीत असल्याचे आवजूर्न सांगितले. पुढील महिन्यात होत असलेल्या अभ्यासनाट्य स्पर्धेचीही त्यांनी माहिती दिली. परिक्षकांच्या वतीने अमोल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचा परिचय अश्विनी कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन उज्ज्वला केळकर यांनी केले. आभार माधुरी ओक यांनी मानले.
स्पर्धा आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजित देशपांडे, अशोक अडावदकर, पूजा पारखी, मंजिरी भाके यांनी परिश्रम घेतले. प्रतिक पारखी यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
गट क्र. 1 (शिशुगट) : प्रथम आयुष आफळे, द्वितीय युवान शिंदे, तृतीय दिक्षा सिनफाल, उत्तेजनार्थ स्वानंदी भागवत, साईराज सावकार, अद्वैत बोडके.
गट क्र. 2 (इ. पहिली-दुसरी) : प्रथम मनस्वी अत्रे, श्रीमयी वायचळ, तृतीय सौम्या सावंत, उत्तेजनार्थ यज्ञा पाटील, अनुश्री जोशी.
गट क्र.3 (इ. तिसरी-चौथी) : प्रथम मनस्वी देशपांडे, द्वितीय आर्या विचे, तृतीय अक्षरा कुणची, उत्तेजनार्थ अद्विका दास, श्रेया चौगुले, काव्या बोरकर.
गट क्र. 4 (इ. पाचवी ते सातवी ) : प्रथम आराध्या हांडे, द्वितीय आत्मज सकुंडे, तृतीय प्रांजली भागवत, उत्तेजनार्थ वेदांत सांगळे, ईश्वरी निकम, स्वरा मोरे, रिया गोखले.
गट क्र. 5 (इ. आठवी ते दहावी) : प्रथम कृष्णा रत्नपारखी, द्वितीय सान्वी भाके, तृतीय जाई कांदेकर, उत्तेजनार्थ स्वरा सांगळे, मुक्ता देशमुख.
गट क्र. 6 (खुला गट) : प्रथम नेहा खरे, द्वितीय माधवी पोतदार, तृतीय अनुराधा पेंडुरकर.
मा. उज्ज्वला केळकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर यांनी सविस्तर माहिती दिली.

About kalakridadoot

Check Also

कवी, लेखक ,कलावंत , खेळाडू , राजकीय नेते यासमवेत समवेत रंगली काव्य मैफिल

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInपुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) नाट्य चित्र कला अकादमी पुणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!