Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

नाट्य संस्कार कला अकादमी, पुणे ची नाट्य छटा स्पर्धेची प्रथम फेरी पूर्ण

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर )
श्री प्रकाश पारखी हे दरवर्षी कै. दिवाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लहान मुलांसाठी, मोठ्या लोकांसाठी नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन गेली ३२ वर्षे सातत्याने करत आहेत.
मा. माधुरी ओक यांच्या प्रयत्नाने पिंपरी चिंचवड परिसरातील शालेय मुलेमुली या स्पर्धेत सहभागी होतात. मा. माधुरी ओक यांच्या मधुश्री कलाविष्कार तर्फे पिंपरी चिंचवड येथे ही स्पर्धा घेतली जाते.
यावर्षी माटे शाळा चिंचवड गाव आणि ज्ञान प्रबोधिनी, निगडी या केंद्रांत या प्राथमिक स्पर्धा झाल्या. जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
खुल्या गटातील जवळपास २५ जणांनी सहभाग घेतला. तरूण तसेच ज्येष्ठ नागरिक देखील यात होते.
परीक्षक म्हणून पुष्कर देशपांडे, अमर गायकवाड, रमेश वाकनीस, अशोक अडावदकर, राहुल बोरकर, पूजा पारखी,प्रकाश पारखी,उज्ज्वला केळकर, रजनी अहिरराव, ज्योती कानेटकर, गौरी लोंढे, संध्या कुलकर्णी, दिप्ती आमवडेकर यांनी काम पाहिले.
मधुश्री कलाविष्कार च्या माधुरी ओक, वर्षा बाल गोपाल, राज अहेरराव, मंजिरी भाके, उज्ज्वला केळकर, प्रतिक पारखी, अजित देशपांडे, अश्विनी कुलकर्णी यांनी संपूर्ण स्पर्धेचे उत्तम नियोजन केले होते.
अंतिम फेरी २० ऑगस्ट २०२३ ला होईल असे संयोजकांनी जाहीर केले.

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!