Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

नाशिक येथे विद्रोही साहित्य संमेलन। समारोपास राजेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती

जालना ( प्रतिनिधी) :नाशिक येथे  पंधरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन दि. 04 व 05 डिसेंबर रोजी होत असून समारोप सञात जालना येथील नागसेन ग्रंथालयाचे संचालक राजेश राऊत हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. जालना जिल्ह्यातील फुले – शाहू- आंबेडकर चळवळीतील लेखक, कवी, पदाधिकारी, कार्यकर्ते ,परिवर्तनवादी विचारधारेच्या अनुयायांनी संमेलनास उपस्थित रहावे. असे आवाहन  राजेश राऊत यांनी केले .
संमेलनाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी ( ता. 02) माहिती देतांना राजेश राऊत यांनी सांगितले,  गंगापूर रोड वरील केटीएचएम महाविद्यालय परिसरात महाकवी वामन कर्डक जन्मशताब्दी साहित्य नगरीत शनिवारी ( दि. 04) सकाळी 09.00 वा. विद्रोही साहित्य संस्कृती विचार याञा निघेल. सकाळी 11.00 वा.
जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गौहर रझा यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होईल. संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद पाटील, समिक्षक सुधाकर गायकवाड, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दोन दिवस होणाऱ्या संमेलनात कविसंमेलन, विविध विषयांवर परिसंवाद, शाहिरी जलसा,नाटक, विद्रोही जीवन गौरव पुरस्कार वितरण, गटचर्चा, बालमंच असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. रविवारी ( ता. 05) सायंकाळी ठराव वाचनानंतर
 06.45 ते 08.00 या वेळेत कायदेतज्ज्ञ अॅड. जयंत जायभाये, डॉ. भालचंद्र मुणगेकर , निलीमा पवार, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्र अध्यक्षा प्रतिमा परदेशी , राजेश राऊत,( जालना),
स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, राजेंद्र बावके ( नगर) यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल.तरी  परिवर्तनवादी विचारधारेच्या अनुयायांनी नाशिक येथे मोठ्या संख्येने यावे. असे आवाहन राजेश राऊत यांनी केले आहे.

About kalakridadoot

Check Also

“पुन्हा तुझ्यासाठी” चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInवानवडी,पुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित पुस्तक प्रकाशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!