Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

नेटबॉलमध्ये धुळ्याच्या मुलींनी मारली बाजी

१६ वी राज्य ज्युनिअर नेटबॉल स्पर्धा- सांघिक सुवर्णपदकासह पटकविला विजेता चषक

धुळे/प्रतिनिधी –  कोल्हापूर येथे नुकतीच १६ वी, राज्यस्तरीय ज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धा झाली. त्यात धुळे जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने बुलढाणा, औरंगाबाद, भंडारा, अहमदनगर व गोंदिया संघाना हरवून प्रथम क्रमांकाचे विजेतेपदकासह चषक व सांघिक सुवर्णपदक प्राप्त केले मुलींच्या संघात -कर्णधार-ऋतुजा आव्हाड ( एस एस व्ही पी एस.कनिष्ठ महाविद्यालय ), उपकर्णधार- गीतांजली खैरनार, कल्याणी पवार, वैभवी खैरनार, साक्षी पाटील, दिपाली शिंदे, हर्षाली पाटील, कल्याणी चव्हाण, पुर्वश्री वाघ, ( सर्व पिंपळादेवी विद्यालय,मोहाडी ), कावेरी पाटील ( कमलाबाई शं.कन्या शाळा, धुळे ), रोशनी सुर्यवंशी ( सेंट अँन्स् इंग्लिश स्कुल, धुळे ), निकिता हिरे ( झेड बी पाटील महाविद्यालय, धुळे ), व्यवस्थापक -योगेश वाघ, प्रशिक्षक-महेंद्र गावडे यांनी काम पाहिले. राष्ट्रीय खेळाडू ऋत्विक ठाकूर व हर्षल भदाणे यांनी विजेत्या संघांला प्रशिक्षण दिले.कोल्हापूरच्या आदर्श गुरुकुलचे अध्यक्ष तथा शिक्षक नेते डी एस घुगरे, आदर्श विद्यानिकेतनचे मनोहर परिट, राज्य अँम्युचेर नेटबॉलचे सहसचिव शाम देशमुख, पंच प्रमुख सतिष इंगळे, अहमदनगर नेटबॉलचे अध्यक्ष प्रा.मिनेश महाजन, जिल्हा सचिव व पदाधिकारी संभाजी गायकवाड, विनय जाधव, योगेश वाघ, समिर शिकलकर, हैदरअली सैय्यद,अविनाश वाघ,महेंद्र गावडे, महेश काळजाते, श्रेयश मठपती, अंकीत भगत, साक्षी कटकवार, योगेश पांडे, यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांला चषक देण्यात आला.महाराष्ट्र अँम्युचेर नेटबॉलचे अध्यक्ष बिपीनभाई कामदार (नागपूर), सचिव डॉ. ललीत जीवानी (गोंदिया), कोषाध्यक्ष एस एन मुर्ती ( वर्धा ), मोहाडी उपनगरतील माजी नगरसेवक विनायक शिंदे, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. दिनेश पाटील, जिल्हा क्रीडाधिकरी आसाराम जाधव, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर व्ही पाटील, क्रीडा महासंघाचे अध्यक्ष महेश घुगरी, सचिव पंढरीनाथ बडगुजर, राज्य खो-खो क्रीडा मार्गदर्शक गुरुदत्त चव्हाण, कला व क्रीडा शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष हेमंत भदाणे, सचिव राहुल पाटील, यांनी राज्य स्पर्धेत प्राविण्य प्राप्त सर्व संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले.

नेटबॉल स्पर्धेचा विजेता चषक स्विकारतांना धुळ्याची कर्णधार ऋतुजा आव्हाड व गितांजली खैरनार

About kalakridadoot

Check Also

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधि – महाराष्ट्र  राज्य सॉफ्ट़बॉल असोशिएशनच्या वतीने 30 वी सिनीअर राज्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!