Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

“पावसाच्या सरीत बहरल्या शब्द सरी” काव्य मैफिल संपन्न

मेढा (जि सातारा) -(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)
ज्ञानाई फाऊंडेशन पुणे आणि विरंगुळा शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था (मेढा जि सातारा) संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या काव्य मैफिलीत रसिकांची मने चिंबचिंब झाली.
कवि संमेलनाच्या अध्यक्षपदी विलास वरे ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य विद्यापीठात अभ्यासक्रमात कविता असणारे कवी होते.प्रमुख पाहुण्या दीपिका कटरे, जयकुमार खरात, सखी चित्रपटाचे निर्माते केतन पाटील, गणेश माजगावकर, ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोककवी सीताराम नरके , विरंगुळा शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.जयश्री माजगावकर सूत्रसंचालक रानकवी जगदीप वनशिव हे मान्यवर हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.जयश्री माजगावकर यांनी केले
काव्यमैफिलीचे पहिले शब्दपुष्प कवी रमाकांत पडवळ धाराशिव यांनी आपल्या शीघ्रकाव्यातून तर अरुण कांबळे , आनंदा भारमल , अंकुश शिंदे , विलास पिसाळ , आनंद गायकवाड , चंद्रकांत जोगदंड , संगीता माने , अनिता जाधव , पुजा माळी, देवेंद्र गावंडे , क्रांती पाटील , सोनाली ढमाळ, अजित माने , संजय भोरे , शुभांगी गायकवाड , जगन्नाथ विभूते , सुशिला डायस , यांनी नवरसात चिंबचिंब करणारी कविता सादर केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास वरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की कवीने भाषण करू नये. आपल्या कवितेतून व्यक्त व्हावे तरच समाजात लिखाणात राजकारणात आपली बांधिलकी जपू . कवीला मुजरा घालणारा कवी हा कविराज आहे.
जयश्री माजगावकर यांनी जावली तालुक्यातील महती सांगणारी माझा जावली तालुका.ही रचना सादर केली अन् रसिक कवीची मने जिंकली कवी लेखक हे परिस्थितीवर थेट भाष्य करत. आता परिवर्तनशील काव्य निर्माण व्हावे..फक्त प्रशंसा करू नये प्रत्येक साहित्यिकाची जबाबदारी आहे वाहवा करण्यात माहीर असणारे परखडपणे बोलत नसतात हे पण आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे
यावेळी महात्मा गांधी वाचनालय कर्मचारीवर्गाचा सन्मान करण्यात आला व पुस्तक प्रती भेट देण्यात आल्या.संचालक अशोक दिक्षित यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.व माजी संचालकपद भूषवणाऱ्या जयश्रीताई माजगावकर यांना हे वाचनालय कायमच सहकार्य करेल असे सांगितले.
ग्रामस्थ मगदूम बाई, छाया पार्टे,सुलोचना पवार,आशाताई मगरे,माधवी कदम,दिक्षा चव्हाण, सौ.शेख व मेढा पोलीस ठाण्यातील मुलींचे निर्भया पथक, साक्षी ससाणे, अदिती ससाणे, सिद्धी शेलार यांनी सहकार्य केले.
काव्यमैफिलीचा समारोप लोककवी सीताराम नरके यांनी केला.

About kalakridadoot

Check Also

जिल्ह्यातील नृत्य दिग्दर्शकांच्या बैठकीचे आयोजन

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनीधी – जालना पिथीयन कॉन्सील व कला क्रीडा दूत फाऊंडेशन, महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!