Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

पेथियंस गेम्सच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्र इंडियाका संघ दिल्ली येथे रवाना

नांदेड / प्रतिनिधी – त्यागराज स्टेडियम, नवी दिल्ली येथे 19 ते 21 डिसेंबर 2023 दरम्यान प्राचीन ग्रीक पायथियन गेम्सचे पुनरुज्जीवन करून, 1 ली पायथियन गेम्स महोत्सव 1630 वर्षानंतर इतिहास प्रथमच होत आहेत.
या मध्ये संगीत, नृत्य, गायन, चित्रकला आणि मार्शल आर्ट विविध खेळाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले असून यामध्ये इंडियाका या खेळाचा सुधा समावेश असून या साठी महारष्ट्र संघ दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी नांदेड येथून संघ रवाना झाला आहे या स्पर्धेसाठी खालील वयोगटाच्या खेळाडू सहभागी होणार आहेत सहभागी खेळाडू पुढील प्रमाणे
*16 वर्ष मुले:* समीप नवघरे (कर्णधार)फुरकान खान,शाखिब सय्यद,उयेस सैयद,सुमणाथ सिद्रल,
बालाजी यांनाम, प्रदीप बत्तुल, कश्यप वागू,आर्यन केशेट्टीवार, , शर्विल भोसले,
*16 वर्ष मुली:* अनुष्का सरपाते(कर्णधार) किशोरी शेठे,तनिक्षका कुलकर्णी,कामाक्षी किणी,आचल कुटे,शांभवी वाकळे,फालगुनी काकडे, पलक्षा येरेकर,तेजस्विनी वाघमारे,
*19 वर्ष मुले:* उमर शेख(कर्णधार) हर्षल मोगल,सिद्धार्थ पडवी,रूद्र देशमुख,अरसलांग सिद्दिकी,रेहान शेख,अभिनव दूधमल
*19 वर्ष मुली:* तमन्ना बोरा (कर्णधार)खुशी सुतार,सायली सदर तेजस्विनी काळे,श्रुती बंगरवार,आदिती भागवत, श्रेया गच्चे,साक्षी गच्चे,
*19 वर्षांवरील मुले:* दिलीप सुर्यवंशी (कर्णधार) सुशांत ठाकूर, आसंग जोंधळे,सुदेश कांबळे,निलेश मोरे,अर्जुन नायर,मयूर वाठोरे.आदी खेळाडू सहभागी होणार आहेत.
वरील संघासोबत राज्य संघटनेचे सचिव रविकुमार बकवाड संघटनेचे उपाध्यक्ष इकबाल मिर्झा, ठाणे जिल्हा चे सचिव वैभव शिंदे, जळगाव जिल्हा सचिव असिफ मिर्झा प्रशिक्षक म्हणून अपेक्षा दडस,विक्रम भोसले, श्रद्धा बिकने,शुभम पाडदे आदी जन रवाना झाले आहेत.
वरील खेळाडूंना नांदेड जिल्हा चे क्रीडाधिकारी बालाजी शिरसिकर , संजय बेत्तेवार सर राज्य संघटनेचे अध्यक्ष रुपेश पाडमुख उपाध्यक्ष प्रवीणकुमार कुपटीकर, लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल चे अध्यक्ष रवींद्र रेड्डी सोलापूर जिल्हा संघटनेचे सचिव राजेंद्र नारायणकर स्पर्धेसाठी शुभेच्छा शुभेच्छा दिल्या.
वरील स्पर्धेचे डीडी स्पोर्ट्सवर उद्घाटन समारंभ थेट. दाखविण्यात येणार आहे

About kalakridadoot

Check Also

अमृता सोपान शिंदेला सुवर्णपदक

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedIn जालना/प्रतिनिधि :- दि 14 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!