Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

प्रधिकरणात दिवाळी विसावा अर्थात सूरमयी शाम रंगतदार

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)
दि 18 नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता निगडी प्राधिकरण येथे मनोहर वाढोकर सभागृहात दिवाळी विसावा अर्थात सूरमयी श्याम हा हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला.पिंपरी विधानसभा शिवसेना संघटिका सौ सरिता साने यांनी या भव्य कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
प्यार का मौसम अशी थीम घेऊन डॉ सौ भाग्यश्री कश्यप आणि त्यांच्या टीम ने अफलातून कार्यक्रम सादर केला.90 च्या दशकातील अवीट गोडीची गाणी सादर केली वादा रहा सनम,सून महिया,होश वालो को खबर क्या..,मन क्यू मेहेका,जाने जिगर जानेमन,साथीयां ये तुने क्या किया,तुने ओ रंगीले कैसा जादू किया अशी अनेक गाणी उत्तम प्रकारे सादर झाली.वैजू चांडवडे,रश्मी बडे आणि भूषण कुमार या अत्यन्त ताकती च्या गायकांनी रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवलं.रशीद भाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अप्रतिम अशी वादना ची साथ दिली. डॉ.सौ.भाग्यश्री कश्यप यांनी अतिशय खुमासदार निवेदन करून रसिकांची मने जिंकली.
सुप्रसिद्ध अभिनेत्री राधा सागर ही या कार्यक्रमा चे विशेष आकर्षण ठरली.आई कुठे काय करते,सुंदरा मनामध्ये भरली अशा मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली राधा सागर हिने प्रेक्षकांशी संवाद साधला।चांद्रमुखी या चित्रपटात ही तिने उत्तम अभिनय केला आहे.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.रसिकांनी या कार्यक्रमाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बन्सल यांच्या प्रदीप स्वीट्स या प्रसिद्ध स्वीट मार्ट ने रसिकांना नाश्ता दिला.
गेली सहा वर्षे सौ सरिता ताई दिवाळी विसावा चे नियोजन करीत आहेत.वेगवेगळ्या कार्यक्रमातून रसिकांचे मनोरंजन करणे आणि रसिकांना उत्तम कार्यक्रमांचा लाभ मिळवून देणे हा या मागचा उद्देश असतो.
सौ ज्योती कानेटकर आणि सौ कल्याणी देशमुख यांनी या कार्यक्रमा चे संयोजन केले.

About kalakridadoot

Check Also

साहित्यिक कलावंत संमेलनात रानकवी जगदीप वनशिव यांची निवड

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInपुणेः- (प्रतिनिधी -बाबू डिसोजा कुमठेकर ) पुण्यातील प्रतिष्ठीत साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!