Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

मत्स्योदरी विधी महाविद्यालयाची भव्य तिरंगा रॅली

जालना – आझादी का अमृतमहोत्सव निमित्त येथील मत्स्योदरी विधी महाविद्यालयाच्यावतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती.
मत्स्योदरी विधी महाविद्यालय येथून प्राचार्या तरन्नुम शेख मॅम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. सदर रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून होत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचली. याठिकाणी प्राचार्या तरन्नुम शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे भाग्य लाभले असुन याचा प्रत्येकाने अभिमान बाळगत अभिमानाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. तिरंगा फडकवताना त्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेत प्रत्येकाने तिरंग्याच्या संहितेचे काटेकोरपणेपालन करण्याचे आवाहनही प्राचार्या तरन्नुम शेख यांनी यावेळी केले. या तिरंगा रॅलीत तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम् जयघोषाने परिसर दणाणून सोडले होते.
सदर तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी प्रा. पवार,प्रा. गोरे, प्रा. हंगरगे. प्रा.जोशी. प्रा. बेंद्रे.
श्री. कोकणे. श्री. वरखडे. श्री. पावशे. श्री. मुळे. घोलप. कॉलेजचे विद्यार्थी अश्विनी कदम वैशाली मस्के, आकाश शेवलीकर विजय चव्हाण, शेख इमरान, पायल खंदारे, पूजा मोताळे, थोरवे,झीने, शिरीन आदींनी परिश्रम घेतले.

About kalakridadoot

Check Also

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा ; निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInनवी दिल्ली, 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!