Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

महात्मा बसवेश्वर पुरस्कार व जयंती व्दिपंधरवाडा कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-कैलासअप्पा गबाळे

जालना : शिवा ंसंघटनेच्या महात्मा बसवेश्‍वर जयंती व्दिपंधरवाड्याचा समारोप आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा बसवेश्‍वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार सोहळ्यास जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकारी- कार्यकत्या र्ंसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलासअप्पा गबाळे यांनी केले आहे. या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १७ जून रोजी सकाळी ११ वाजता महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा समारोप आणि महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ओबीसी मंत्री विजय वडेवट्टीवार, राज्यमंत्री बच्चू कडू, शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. श्री. गबाळे यांनी म्हटले आहे की, शिवा संघटनेच्या प्रयत्नानंतर वीरशैव लिंगायत समाजाचे दैवत महात्मा बसवेश्‍वर यांची जयंती प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरी होऊ लागली. तेव्हापासूनच खर्‍या अर्थाने महात्मा बसवेश्‍वरां च्या जयंतीला सार्वजनिक स्वरुप प्राप्त होऊ लागले. याचाच एक भाग म्हणून शिवा संघटनेच्यावतीने जयंती व्दिपंधरवाडा परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे ३ मे पासून सुरु करण्यात आला. या व्दिपंधरवाड्याचा समारोप आणि पुरस्कार वितरण मुंबई येथे मंत्रालयाच्या समोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मागील सहा वर्षापासून समाजातील एका व्यक्तीसह एका संस्थेला सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येते. शिवा संघटनेने देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती शासनाला सुरू करायला लावली तेव्हा पासुन जयंतीला मोठे सार्वजनिक स्वरूप येण्यासाठी, एक महिना महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रम उपक्रम घेऊन जयंती द्विपंधरवाडा सुरू केला. या वर्षीचा शिवा संघटनेच्या जयंती द्विपंधरवाड्याचे उद्घाटन दि.३ मे रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे झाले तर जयंती द्विपंधरवाडा अंतर्गत महिनाभर महाराष्ट्र व इतर राज्यासह विविध कार्यक्रम, उपक्रम घेऊन जयंती साजरी होत आहे, या द्विपंधरवाड्याचा समारोप मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवार दि.१७ जुन रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे वरील मान्यवरांसह अनेक मंत्री, आमदार आणि गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.  यावेळी शिवा संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व वीरशैव-लिंगायत समाज बांधवांनी तसेच महात्मा बसवेश्वर प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवा संघटनेचे जालना जिल्हा संपर्कप्रमुख सतीशआप्पा तवले, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास आप्पा गबाळे, ऍड. संदीपअप्पा दारुवाले, गजानन आप्पा कारेगावकर, बंडुआप्पा परदेशी, राजूर शाखेचे अध्यक्ष भीमाशंकर दारुवाले, सुरेश दारुवाले, वसंत कोमटे,  प्रमोद देशमाने यांनी केले आहे.

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!