जालना येथील मुर्गी तलाव परिसरातील नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जालना भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्थेद्वारा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 15 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित विविध स्पर्धेत यश प्राप्त केले. बुलबुल विभागात चित्रकला स्पर्धेत ऐमन असगर शेख हीने तृतीय क्रमांक प्राप्त केला . बुलबुल विभागात देशभक्ती गीत गायन स्पर्धेत उम्मे कुलसुम मतीन कुरेशी हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला . कब विभागात अवेज रफीक शेख ह्याने तृतीय क्रमांक प्राप्त केला . गाईड विभागात देशभक्ती गीत गायन स्पर्धेत आदीबा नाजिम शेख हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे व रोहीना नाज जावेद शेख हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. या यशाबद्दल शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती मंगल धुपे व शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री कैलास दातखिळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मुख्याध्यापिका अख्तर जहाँ कुरैशी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रोत्साहित केले.शिक्षका शिरीन समिना, विद्या जगनाडे यांचे मार्गदर्शन लाभले. या गौरव प्रसंगी जिल्हा संघटक स्काउट के. एल. पवार जिल्हा संघटक गाईड सोनिया शिरसाट जिल्हा प्रशिक्षण आयुक्त व्ही.बी. गायकवाड, शहादेव गायकवाड, प्रकाश कुंडलकर,उषा माने, विलास इंगळे, शिवाजी पाटेकर, के.जी. भालेराव, निलेश श्रीसुंदर ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
