Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

मैत्र जीवांचे राज्यस्तरीय काव्य मैफिल संपन्न

निगडी प्राधिकरण, पुणे- (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)
मैत्रीचा सातबारा मैत्र जीवांचे भव्य राज्यस्तरीय काव्य मैफिल शब्दप्रभूनी विविध विषयांवर कविता सादर केल्या.
काव्यमैफिलीचे उद्धाटन प्रा हनुमंत धालगडे सर यांच्या शुभ हस्ते झाडांला जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
राज्यस्तरीय काव्य मैफिलचे अध्यक्ष डॉ लक्ष्मण हेंबाडे (मंगळवेढा डोंगरगाव ) यांनी भूषविले
प्रमुख पाहुणे बबन पोतदार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक लेखक ,जयश्री सोनवणे वृत्तनिवेदिका कवयित्री समाजसेविका यांनी उत्सवमूर्ती बाळासाहेब गिरी यांच्या वाढदिवसाचे गीत सुमधुर स्वरात सादर करून रसिकांची,कवींची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कवी चंद्रकांत जोगदंड, आनंद गायकवाड ,ऋषीकेश भोसले तानाजी शिंदे, प्रा अशोक शिंदे, देवेंद्र गावंडे ,रानकवी जगदीप वनशिव यांनी हे आयोजन केले होते.
बबन पोतदार यांनी आपल्या मनोगतात मैत्री कशी असावी ,कशी जपावी ,मनोबल वाढवणारे मित्र असावेत. कुरघोडी करणारे मित्र नसावेत.
मैत्रीच्या झऱ्यातून झुळझुळणारे पाणी अमृताचा डोह म्हणजे मैत्री वाहत राहणे त्यालाच मैत्र जीवांचे म्हणतात.
रानकवी जगदीप वनशिव हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक आहेत त्यांना खास ऐकण्यासाठी मी येथे प्रमुख पाहुणा म्हणून आलो आहे ते एक निमित्त आहे रानकवीच्या शैली गोडवा पहाडी आवाजात सादरीकरण वेगळेपण बहारदार चपराक टोले खडे बोल ते नेहमी देतात. ताशेरे ओढले तर समाजातील बदल घडून येतो अशी सर्वाची प्रगती होवो मित्रांचा वाढदिवसाच्या दिवशी राज्यस्तरीय काव्यं मैफिल घेवून वाढदिवस साजरा करतात खरंच जगावेगळी मैत्री कशी असावी हा आदर्श दाखला खरंच माझे मन प्रसन्न प्रफुल्लित झाले, असे ते म्हणाले.
तसेच जयश्री सोनवणे यांनी मैत्रीचे प्रेमभाव उलगडून सांगितले जे चांगले मित्र तेच खरे श्रीमंत मित्र समजावे खोडवा म्हणजे गोडवा असे त्या म्हणाल्या.
उद्घाटक प्रा हनुमंत धालगडे सर यांनी अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले. कवी लेखक नागराज मंजुळे दिग्दर्शक सारखे व कवी चंद्रकांत जोगदंड सारखे विद्यार्थी घडले, या दोघा़चे ते गुरूवर्य आहेत. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते ते आज मला पाहिला मिळाले असे प्रा धालगडे सर म्हणाले.

काव्य मैफिलीचे पहिले शब्द पुष्प अर्पण करण्यासाठी सुप्रसिद्ध कवी पत्रकार गुलाब राजा माळी यांनी आपली पहिली रचना सादर करून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तसेच महादेव लांडगे यांनी पोवाडा सादर करूनही टाळ्यांचा गजर मिळवला सागर काकडे यांनी शोकेश ही कविता सादर करून कवीची होणारी जीवाची तगमग संसार रूपी रथातील प्रसंग व्यक्त करत मने हेलकावून टाकली तसेच कवयत्री गझलकारा सारिका माकोडे यांनी मंत्रमुग्ध करणारी रचना सादर केली.

काव्यमैफिलीचे अध्यक्ष डॉ लक्ष्मण हेंबाडे तात्या यांनी हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या दैनंदिनी घटना आपल्या कवितेत व्यक्त केली
डोहात वेदनांच्या
बुडतात धर्म जाती
नजरेसमोर माझ्या
विझतात कैक वाती
रुग्णालयात माझ्या….
ही रचना सादर करूनी हळव्या यातना प्रगट केल्यावर रसिक कवी या सर्वांना गहिवरून आले
जीवन जगत असताना आलेल्या अनुभवावरून व्यक्त होत जावे मनातले भाव समाजापुढे आले तरच समाजात प्रतिष्ठा व प्रबोधन नक्कीच घडेन अशी त्यांनी ग्वाही दिली साहित्यिकांनी वास्तवाचे भान संभाळत रचना लिहिल्या पाहिजेत कल्पना स्वप्नात न गुंता परखडपणे आपली मते मांडली पाहिजेत असे प्रतिपादन डॉ लक्ष्मण हेंबाडे यांनी केले

राज्यस्तरीय काव्य मैफिलीत राज्यातून अनेक कवी कवयित्री यांनी हजेरी लावली.
गौरव पुंडे (राजगुरुनगर),महादेव लांडगे( बीड) उत्सवमूर्ती बाळासाहेब गिरी यांनी मित्र कसे असावेत ते आपल्या कवितेत व्यक्त झाले तसेच आनंद गायकवाड ऋषीकेश भोसले सीताराम नरके दिनेश गायकवाड राहुल भोसले बाबा ठाकूर विलास कुंभार के मोगल नकुसाताई लोखंडे प्रा मधुकर साळवे बबन धुमाळ सुप्रिया लिमये राजर्षी वाणी प्रा प्रतिमा काळे नानाभाऊ माळी माणिक गोडसे गोरख पालवे रामदास शेळके विजय इंगळे अरूण कांबळे जितेन सोनवणे योगिता कोठेकर राधिका घोडके किशोर टिळेकर सुर्यकांत नामगुडे विवेक म्हस्के उमाकांत आदमाने दीपाली खामकर लक्ष्मण शिंदे रूपाली अवचरे संजय भोरे पांडुरंग म्हस्के अशोक वाघमारे विनोद अष्टुळ जनाबापू पुणेकर अशा अनेक कवींनी हजेरी लावली
या काव्यमैफिलीचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या शीघ्रकाव्यातून रसाळ वाणीतून ओघावत्या शैलीत सूत्रसंचालन बहारदार दमदार केले.
समारोप कवी चंद्रकांत जोगदंड यांनी केले

About kalakridadoot

Check Also

“पुन्हा तुझ्यासाठी” चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInवानवडी,पुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित पुस्तक प्रकाशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!