Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

मौजपुरीत रंगला कुस्त्याचा आखाडा; मल्लांनी जिंकली 55 हजाराची बक्षिसं

जालना तालुक्यातील मौजुपरी गावात प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षी देखील गुढी पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य कुस्त्यांचा आखाडा रंगला होता. यावेळी सुमारे 70 मल्लांनी 55 हजार रुपयाची बक्षिसं जिंकली.

मौजुपरी येथील श्री रामेश्वर संस्थान हे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. पंचक्रोशीत या संस्थानचे महत्व असल्याने लोखो भावीक दर्शनासाठी रामेश्वर मंदीरात येतात. महाशिवरात्री आणि गुढी पाडव्याला या मंदीर परिसरात मोठ्या प्रमाण भावीकांची गर्दी होत असते. गुढी पाडव्याच्या निमित्ताने मंदिरात भावीक कावड खेळतात तर अनेकांनी कबुल केलेले नवसं फेडण्यासाठी बारा गाड्या ओढतात. पाडव्याच्या  दिसव आधी काठी बसवून तिची मनोभावे सेवा केली जाते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. सायंकाळच्या वेळी मंदिर परीसरात रेवड्या उधळून आणि अंबील वाटून भक्तीची सेवा केली जाते. पाडव्याच्या दुसर्‍या दिवसी मौजपुरीत कुस्त्यांचा सामना रंगत असतो. या वर्षी देखील मौजुपरी येथे सुमारे 70 मल्लांनी कुस्तीमध्ये सहभाग नोंदविला होता. कमीत कमी 100 रुपयापासून ते 11 हजार रुपयापर्यंत कुस्तीचे बक्षिसं ठेवण्यात आली होती. गावात कुस्तीसाठी आलेल्या मल्लांना जाण्यायेण्यासाठी 200 रुपये तर कुस्ती जिकंणार्‍या मल्लांना बक्षिसं देण्यात आली. यावेळी मल्लांच्या जेवणाची व्यवस्थाही गावकर्‍यांच्या वतीने करण्यात आली होती. मौजुपरी गाव हे तसे मल्लांचे गाव म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे मल्लांची काळजी आणि मल्लांची परंपरा कायम ठेवण्यात गावकरी सदैव प्रयत्नशिल असतात. या वर्षी कुस्तीच्या यशस्वी नियोजनासाठी सरपंच भागवत राऊत, उप सरपंच आप्पासाहेब डोंगरे, बद्रीनारायण भसांडे, सत्यनारायण ढोकळे, राम जाधव, नारायण गायकवाड, विष्णू डोंगरे, बंडू काळे, बालाजी बळप, बंडू डोंगरे, अच्युत मोरे, निवृती जाधव, बळीराम गायकवाड, कृष्णा हिवाळे, माऊली ढोकळे, ज्ञानेश्वर ढोकळे, बबन डोंगरे, दत्ता काकडे, हरी काळे, दिपक डोंगरे, रामेश्वर महाडीक, बबन शामगीर, नारायण शामगीर, अरुण डोंगरे, अंकुश काळे, रामेश्वर गावकवाड, गजानन गायकवाड, आबासाहेब डोंगरे, राम डोंगरे, राम शेजुळ यांनी परिश्रम घेतले.

About kalakridadoot

Check Also

योगासन स्पोर्ट्स स्पर्धेचे उद्घाटन

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedIn जालना, दि. २७- महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन तर्फे जालना जिल्हास्तरीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!