Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

म.न.पा. मुर्गी तलाव शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात

जालना/प्रतिनिधी –  येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा रिजवाना जावेद शेख यांच्या हस्ते करण्यात आले सन 2024 -25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांच्या शिक्षकांकडून चॉकलेट्स देऊन स्वागत करण्यात आले, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. पालकांचे ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी प्रवेश पात्र सर्व मुलांची नाव नोंदणी करणे, वजन, उंची, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणन पूर्व तयारी, पालकांना मार्गदर्शन, आदी उपक्रम राबवण्यात आले. “माझी शाळा माझा अभिमान ” हे घोषवाक्य दर्शविणारा सेल्फी पॉईंट विद्यार्थ्यांसह पालकांसाठी आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरला. विद्या जगनाडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. प्रभारी मुख्याध्यापिका शिरीन समीना यांनी मार्गदर्शन केले. तर रेखा गायकवाड यांनी आभार व्यक्त केले याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती सदस्या फरजाना बेगम, सफिया बेग,शिक्षक अ.वहीद जावेद,जिजाबाई, शिरीन बेगम,रईसा बेगम पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

About kalakridadoot

Check Also

शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवा – पोलिस अधीक्षक तुषार दोशी

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInकर्जत येथील राजुरेश्वर मध्ये ‘मी कसा घडलो’ कार्यक्रमात प्रतिपादन… अंबड/ प्रतिनिधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!