Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683
Rahul lonikar

युवा पिढीसाठी व उत्तम आरोग्यासाठी मैदाणी खेळ अत्यावश्यक – राहुल लोणीकर

प्रतिनिधी -शाळा महाविद्यालयासह ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असून शरीर प्रकृती निरोगी असेल तर प्रतिकारशक्ती चांगली राहते त्यामुळे आरोग्याच्या समस्या उदभवत नाहीत मागील काळात कोरोना महामारी दरम्यान या सर्व बाबींचा अनुभव सर्वांनी घेतलेला असून उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि खेळ अत्यावश्यक असल्याचे मत भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी व्यक्त केले
मंठा तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री राहुल लोणीकर बोलत होते यावेळी गणेशराव खवणे, माऊली वायाळ, संभाजी खंदारे, विठ्ठल मामा काळे, प्रसादराव गडदे, अविनाश राठोड, शिवशंकर डोईफोडे, मुकेश राठोड, पंकज राठोड,सुरेश हिवाळे, आनंद जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

Rahul lonikar
मोबाईल मुळे युवा पिढी खेळापासून दूर गेली असून खेळाच्या माध्यमातून सांघिक भावना जोपासणे आवश्यक आहे आजच्या परिस्थितीत खेळापासून दूर जात तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे युवकांचे शारीरिक स्वास्थ्य बिघडत चालले असून तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करण्यापेक्षा युवकांनी मैदानी खेळावर अधिकाधिक भर देणे आवश्यक आहे त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य बरोबर मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम राहते शारीरिक स्वास्थ्य सुदृढ असेल तर युवकांना विविध क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात असेही श्री लोणीकर यावेळी म्हणाले. खेळाद्वारे स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन खेळाडूंसाठी प्रतियोगी व आव्हानात्मक वृत्ती निर्माण होते त्यासाठी युवकांनी आव्हानांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे त्यामुळे तरुणांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व्यक्तिमत्व विकास व आत्मविश्वास यामध्ये वाढ होऊन खेळामुळे शारीरिक व मानसिक संतुलन राखण्यास मदत होते असेही श्री लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केलेयापूर्वी ऑलम्पिक किंवा त्यासारख्या अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना असे यश मिळत नव्हते परंतु केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारने खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून दिल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातील युवक आपला ठसा उमटवत आहेत त्यामध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचे वर्चस्व असून सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडू देखील देशाचे मान उंच जाऊ शकतात हे सिद्ध झाले आहे असेही श्री लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी परिसरातील नागरिक, खेळाडू, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

About kalakridadoot

Check Also

योगासन स्पोर्ट्स स्पर्धेचे उद्घाटन

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedIn जालना, दि. २७- महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन तर्फे जालना जिल्हास्तरीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!