Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

योगासन स्पोर्ट्स स्पर्धेचे उद्घाटन

जालना, दि. २७- महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन तर्फे जालना जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक रितेश मंत्री यांचे हस्ते व्ही एस एस महाविद्यालय येथे करण्यात आले.

यावेळी प्रमुख अथिती म्हणून डॉ. शिवानंद मिरकड बाल रोग तज्ञ, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. प्रसाद मदन, प्रमुख उपस्थिती म्हणून ऑलम्पिक जिल्हा सचिव शेख चाँद पी. जे., डॉ. अस्मिता शिंदे विभाग प्रमुख स्वास्थवृत्त योगविभाग आयुर्वेद महाविद्यालय, जालना, हे उपस्थित होते
उद्घाटन वर बोलताना प्राचार्य डॉ. मदन यांनी सर्व स्पर्धकांचे मार्गदर्शन केले व स्पर्धेचे स्वरूप सांगितले, योगासन स्पोर्ट चे राष्ट्रीय स्तरवरचे निकष आणि त्यासाठी लागणारी तांत्रिक बाबी जिल्हाचे तांत्रिक सचिव प्रल्हाद हर्बक यांनी सांगितली. या वेळी पंच आणि रिफेरी अंजली देशपांडे,  देवा चित्राल अंबड, शिल्पा शेळगावकर, डॉ. चेतनकुमार भागवत, डॉ. हेमंत वर्मा, डॉ. किशोर बिरकायलू आणि मोठ्या संख्येने खेळाडू पालक आणि विधार्थी उपस्थित होते.

    स्पर्धा विविध गटात आणि योग प्रकारात होणार असून यात एकुण ५६ खेळाडूंनी नाव नोंदविले आहे असे आयोजकांचे वतीने सांगण्यात आले. स्पर्धेचे समारोप रविवारी होणार.
यातून निवडलेला संघ १६ ते १८ ऑगस्ट रोजी संगमनेर येथे होणाऱ्या महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशनच्या राज्य स्पर्धेसाठी पाठवला जाईल.

About kalakridadoot

Check Also

जाफराबाद तालुक्यातील ११ मुले कराटे बेल्ट एक्झाम उत्तीर्ण

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedIn जाफराबाद/प्रतिनिधी  : सातारा येथे संपन्न झालेल्या तीन दिवसीय कराटे शिबीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!