जालना/प्रतिनीधी – दि. 28 ते 30 जुलै 2023 दरम्यान नांदेड येथे संपन्न होणार्या दुसर्या राज्यस्तरीय इंडियाका अजिंक्यपद स्पर्धा 2023 करीता जालना जिल्हा इंडियाका असोसिएशन यांच्या वतीने सबज्युनीयर, ज्युनीयर व सिनीयर वयोगटासाठी दि. 19 जुलै 2023, बुधवार रोजी सकाळी 10 वाजता देवगिरी इंग्लिश स्कुल अंबड रोड जालना याठिकाणी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर निवड चाचणीतुन प्रत्येक वयोगटात 10 मुले व 10 मुली यांची निवड करण्यात येईल. निवडलेला संघ राज्यस्तरीय स्पर्धेत जालना जिल्ह्याचे नेतृत्व करेल.
निवड चाचणीत सहभागी होण्याकरीता सबज्युनीयर करीता 16 वर्षाआतील, ज्युनीयर करीता 19 वर्षाआतील व सिनीयर करीता वयाची कोणतीही अट नाही तसेच निवड चाचणीत सहभागी होण्याकरीता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
अधिक माहिती करीता संघटनेचे अध्यक्ष शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366 किंवा सचिव मंगेश सोरटी मो.नं. 9028943704 यांच्याशी किंवा जयकुमार वाहुळे, श्रीमती किरण पाटील, अविनाश पवार, गणेश गायके, संतोष वाघ, नितीन जाधव, शेख समीर, सोहेल खान, वेदांत सोरटी यांच्याशी संपर्क साधावा.
तरी सदर निवड चाचणीत जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडुंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, राज्य क्रीडा मार्गदर्शक शेख मोहम्मद, संतोष वाबळे, क्रीडा अधिकारी रेखा परेदसी, देवगिरी विद्या प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बबनदादा सोरटी, प्रा. गायत्री सोरटी, माजी नगरसेवक जयंत भोसले, बाला परदेसी, मिर्झा अनवर बेग, ज्ञानेश्वर ढोबळे, राजकुमार दांडगे आदींनी केले आहे.
