जालना/प्रतिनिधी – कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यामाने ५ व ६ नोव्हेंबर रोजी १४ वर्षा खालील सब जुनीयर व कॅडीट ही स्पर्धा संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सदरील स्पर्धेसाठी गायत्री लॉन अंबड़ चौफुली जालना, येथे दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रविवार रोजी जिल्हा स्तरीय निवड चाचणी कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी जालना जिल्ह्यातील कराटे खेळाडू प्रेमीनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग होऊन आपली उपस्तिथि नोंदवावी असे आवाहन कराटे डो असोसिएशन ऑफ जालना चे अध्यक्ष नसीर शेख, सचिव इब्राहीम मुन्नीवाले, कोषाध्यक्ष शिवम गवळी, उपाध्यक्ष गणेश शिंदे, सह सचिव दिनेश वाघमारे तसेच कला क्रीडा दूत फाउंडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष शेख चाँद पी.जे. यांनी केले.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९३७२०८९३०८, ९०४९१०३६५६, ७७४१८३१३४१ या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा.
