Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राज्यस्तरीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेत जालना जिल्हा प्रथम

जालना/प्रतिनिधी – परभणी जिल्हयातील सेलू येथे दिनांक २५ ते २७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय मिनी व १५ वी वरिष्ठ गट जम्परोप अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत जालना जिल्हा संघातील नेर जि.प.प्रशालेतील खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करून राज्यात प्रथम क्रमांकाचे अजिंक्यपद मिळविले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातून कोल्हापूर, मुंबई उपनगर, अमरावती, बुलढाणा, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया सह अनेक जिल्ह्यातील संघ सहभागी होते.
यावेळी जालना जिल्हा संघातील सोमेश देवमुरारी याने ३० सेकंद स्पीड रीले मध्ये सुवर्ण व ३० सेकंद स्पीड रौप्य पदक मिळविले , प्रशिक पाईकराव याने डबल अंडर रीले मध्ये सुवर्ण पदक तर ३० सेकंद स्पीड ब्राँझ पदक मिळविले, कृष्णा तरासे याने स्पीड मध्ये सुवर्ण पदक व स्पीड रीले मध्ये सुवर्ण पदक मिळविले, शिवम उफाड याने डबल अंडर रीलेत सुवर्ण पदक, व्यंकटेश कुळवंत याने डबल अंडर रीले सुवर्ण पदक, नकुल उफाड याने स्पीड रीले सह दोन सुवर्ण पदक तर विराज काळे याने डबल अंडर सह दोन सुवर्ण पदक मिळवले. खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक तथा जिल्हा संघाचे प्रशिक्षण उमेश खंदारकर यांचे मार्गदर्शन लाभले.या यशा बद्दल त्यांचे जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव शेख चांद पी.जे., जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, माजी विस्तार अधिकारी बाबुराव पवार,मुख्याध्यापक श्रीकांत गायकवाड,  क्रीडा संघटक श्रीकांत देशमुख, आकाश कोठीवाले जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले. अभिनंदन केले.

About kalakridadoot

Check Also

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधि – महाराष्ट्र  राज्य सॉफ्ट़बॉल असोशिएशनच्या वतीने 30 वी सिनीअर राज्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!