Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राणी लक्ष्मीबाई स्व-संरक्षण पथकाची स्थापना

जालना/प्रतिनिधी – दिवसेंदिवस महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे, जनता केवळ निषेध मोर्चे काढून वेळ मारून नेत आहे, परंतु हे कुठेतरी थांबवण्याकरिता ठोस पावले उचलण्याची गरज असल्याने देवगिरी इंग्लिश स्कूल च्या अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा. गायत्री सोरटी यांच्या नेतृत्वाखाली महिला व मुलींना स्व-संरक्षनाची कला शिकवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून येणारी पिढी सुरक्षित करण्यासाठी *राणी लक्ष्मीबाई स्व-संरक्षण पथक* स्थापन करण्यात आले आहे.
आज जागतिक ऑलिम्पिक दिवसाचे औचित्य साधून सदर पथक स्थापन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर तर विशेष उपस्थिती मध्ये महिला व बाल संरक्षण समितीच्या सदस्यां श्रीमती विद्या लंके ह्या उपस्थित होत्या. यावेळी मंचावर देवगिरी इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष बबन दादा सोरटी, मुख्याध्यापिका प्रा. गायत्री सोरटी, तज्ञ प्रशिक्षक युवराज गाडेकर, डोली बॉक्सिंग असोसिएशन चे सचिव प्रशांत डोली यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली, तद्नंतर पथकाची माहिती व प्रास्ताविक प्रा. गायत्री सोरटी यांनी केले तर सूत्र संचलन मो. रफी व शेख चाँद पी.जे. यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती कृतिका मॅडम यांनी केले.
यावेळी देवगिरी इंग्लिश स्कूल च्या विध्यार्थ्यांनी स्पोर्ट्स थीम वर ऑलिम्पिक दिवसाच्या अनुषंगाने उत्कृष्ट असे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे संचालक वेदांत सोरटी, क्रीडा शिक्षक मंगेश सोरटी, डान्स टीचर ऋषी डोंगरे, ड्राइंग टीचर राजेश गायकवाड़, कमला ठाकुर, रोहिणी गिरी व इतर शिक्षक यांनी यांनी अथक परिश्रम घेतले.

About kalakridadoot

Check Also

अमृता सोपान शिंदेला सुवर्णपदक

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedIn जालना/प्रतिनिधि :- दि 14 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!