Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राष्ट्रीय क्रीडा दिन निमीत्त जिल्हास्तरीय टेंनिसबॉल क्रिकेट स्पर्धा व विविध उपक्रमांचे आयोजन


जालना/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे सुचनेनूसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा एकविध क्रीडा संघटना, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता स्व. मेजर ध्यानचंद, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार समारंभ देवगिरी इंग्लीश स्कुल, जालना येथे आयोजीत करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. रविंद्र परळीकर, अप्पर जिल्हाधिकारी, जालना, प्राचार्य, डॉ. दयानंद भक्त, देवगिरी इंग्लीश स्कुलचे अध्यक्ष मा. बबनदादा सोरटी हे उपस्थित राहणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून दि. 27 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना व जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोशिएशन, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने
जिल्हास्तर ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे करण्यात येत आहे.
सदर स्पर्धेत जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी केले आहे.
दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 09.00 वाजता फिट इंडिया फ्रिडम रन या उपक्रमाचे आयोजन देवगिरी इंग्लीश स्कुल, जालना येथून करण्यात येत आहे. सदर स्पर्धेची मा. गणेश निहाळी, उपजिल्हाधिकारी, जालना हे हिरवा झेंडा देऊन सुरूवात होणार आहे. फिट इंडिया फ्रिडम रन या उपक्रमामध्ये जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडा संघटना, नागरिक, महिला, अधिकारी कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
दि. 02 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे कबड्डी, फुटबॉल व खो-खो खेळाचे प्रदर्शनीय सामने आयोजित करण्यात येणार आहे. सदर सामन्याचे उद्घाटन मा. कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी (प्रा), जिल्हा परिषद, जालना यांच्या शुभहस्ते होणार आहे. सदर स्पर्धेत जिल्हयातील जास्तीत जास्ती खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिन निमीत्त आयोजित विविध स्पर्धेत व उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडा संघटना, नागरिक, महिला, अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग व्हावे असे आवाहन अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडा
अधिकारी, जालना यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री महेश खर्डेकर, श्री महमंद शेख, श्री संतोष वाबळे, क्रीडा मार्गदर्शक, श्री शेख चाँद पी.जे., क्रीडा संघटक यांच्याशी संपर्क साधावा.

About kalakridadoot

Check Also

योगासन स्पोर्ट्स स्पर्धेचे उद्घाटन

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedIn जालना, दि. २७- महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन तर्फे जालना जिल्हास्तरीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!