सोलापूर/प्रतिनिधी – राज्य फुटबॉल टेनिस असोसिएशन तसेच ऑल इंडिया फुटबॉल टेनिस फेडरेशन व सोलापूर शहर जिल्हा फुटबॉल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन ताराळकर, ऑल इंडिया फुटबॉल टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष राम अवतार( दिल्ली), प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सुधीर लांडे,महाराष्ट्र राज्य फुटबॉल टेनिस संघटनेचे सचिव व आयोजक स्पर्धा आयोजक भीमराव बाळगे व इकबाल शेख ,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप भंडारे, धर्मराज पुजारी, जिल्हा काँग्रेसचे संघटक रमेश हासापुरे, राज्य फुटबॉल टेनिस संघटनेचे सहसचिव शिवकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी एकूण आठ राज्य सहभागी झाले असून दोनशे खेळाडूंनी सहभाग नोंदविला या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे कोच धनंजय धेंडे, सुरेश सोनवणे, मनोज बाळगे हे परिश्रम घेत आहेत.
आजचे निकाल खालील प्रमाणे :
14 वर्षाखालील मुले ट्रिपल
प्रथम – रेहान खान ,अधीर खान,
मीर साजिद (ओडीसा)
द्वितीय- आर धनुष ,पी एस कमलेश, एस के सूर्या.(तामिळनाडू)
17 वर्षाखालील ट्रिपल
प्रथम- (तामिळनाडू) रत्नदीप नाईक, सय्यद अली, साई राऊत
द्वितीय- (ओडीसा)
शिवशी एस, डेरिंग चंदिर ,नवीन जे