Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राष्ट्रीय सेवा योजना संस्कार देण्याचे काम करते.   शिबीर समारोप – प्रा डॉ सोमिनाथ खाडे

जालना ( )- आजच्या महाविद्यालयीन तरुण पिढीला रा से यो शिबिरामधून राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण मिळते. तसेच आपणही समाजाचे देणे लागतो हा विचार मिळून युवकांना चांगले संस्कार देण्याचे काम अशा शिबिराच्या माध्यमातून होताना दिसून येते असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा डॉ सोमिनाथ खाडे यानी केले.
       मौजे कचरेवाडी ता जि जालना येथे अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय विशेष शिबीर समारोप सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते असे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेमुळे जीवनाचे कल्याण होते. अनेक चांगल्या सवयी जडतात. आजपर्यंत देशात मागील 52 वर्षात 3 कोटींपेक्षा अधिक स्वयंसेवकांनी अशा स्वरूपाचे शिबीर केलेले आहे. या शिबिराच्या माध्यमातून जलसंधारण, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपणाच्या कामाचे कौतुक केले. तसेच स्वच्छता हाच देव समजून समाजातील प्रत्येक घटकाने काम करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने दुःख, वेदना, संवेदना जाणून घेतल्या पाहिजे. प्रत्येक माणूस माणुसकीच्या माध्यमातून जोडल्या गेला पाहिजे तेंव्हाच देश जोडल्या जाईल. समाजातील अनिष्ट प्रथा आजचा युवकच बंद करू शकतो त्याची शिकवण रा से यो मध्ये मिळते. तसेच प्रत्येक युवकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. जात, धर्म, पंथ सोडून आपण एक भारतीय आहोत त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करुन स्त्री समानतेसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
       या समारोप सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ दादासाहेब गजहंस असे म्हणाले की, रा से यो शिबिराच्या माध्यमातून गावामध्ये सिमेंट बंधारा पूर्ण होत आहे ही खूप मोठी फलश्रुती आहे. कोणत्याही कामाची सुरुवात महत्वाची आहे ती या शिबिराच्या माध्यमातून झाली हे महत्वाचे आहे. शिबिरामधून शिस्त कशी लागते हे उदाहरणाच्या अनुषंगाने पटवून दिले. शिक्षणामुळे अंतर्बाह्य परिवर्तन होते तसेच जीवनात शॉर्टकट महत्वाचा नसतो ही शिकवण रा से यो मधून मिळते आणि दोष दूर करण्याचे शिबीर हे एक महत्वाचे माध्यम आहे. हेच काम अंकुशराव टोपे महाविद्यालय सातत्याने करीत आहे असे त्यांनी सांगितले.
     समारोप सोहळ्याची सुरुवात म गांधींच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रा डॉ सुरेंद्र पडगलवार यानी अहवाल वाचन करुन शिबिरामध्ये झालेल्या उपक्रमाची माहिती दिली.तसेच रक्तदान करणाऱ्या स्वयंसेवक, ग्रामस्थाना मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपप्रचार्य डॉ संजय पाटील, श्री बाबासाहेब डोंगरे,श्री प्रवीण ससाणे (सरपंच), श्री लक्ष्मण कचरे (पोलीस पाटील ), श्री भगवान कचरे (तंटामुक्ती अध्यक्ष), श्री ज्ञानेश्वर कचरे (अध्यक्ष रा कॉ ), माजी सरपंच, महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद, स्वयंसेवकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा अविनाश भालेराव तर आभार डॉ मसूद अन्सारी यानी मानले.

About kalakridadoot

Check Also

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा ; निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInनवी दिल्ली, 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!