Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

रोहिलागड येथे केंद्रस्तरीय गुणवता कक्षाची बैठक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न

रोहिलागड (प्रतिनिधी) तालुका अंबड येथे मूलभूत साक्षरता व अंकज्ञान अभियानांतर्गत अध्ययन स्तर निश्चिती टप्पा क्रमांक 1 मध्ये अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ॲक्शन प्लॅन करण्यासाठी व जिल्हास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठकीत केंद्राची सादरीकरण करण्यासाठी दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी येथिल केंद्रप्रमुख राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्रीमंत गंगावणे  यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला आली यावेळी केंद्रातील विविध विषयात 20 एक्सपर्ट शिक्षक टेक्नो शिक्षक यांच्या माध्यमातून दहा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला व विषय निहाय तज्ञ शिक्षकांची नियुक्ती करून त्यामार्फत विद्यार्थ्यांना पूरक अध्ययन साहित्य अभ्यास वर्ग मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे ठरले प्रारंभी बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले केंद्राचे केंद्रप्रमुख  राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्रीमंत गंगावणे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले त्यांनी वर्ग एक ते आठ अध्ययन स्तर निश्चिती मध्ये मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जोगेश्वर वाडी व श्रीकृष्ण नगर या शाळेच्या मुख्याध्यापकांना कृती कार्यक्रम आखण्याचे मार्गदर्शन केले तर गुणानुक्रमे प्रथम आलेल्या चिकनगाव कौचलवाडी व माहेर भायगाव या शाळेची जिल्हा स्तरावर होणाऱ्या   गुणवंता कक्षाच्या बऐठकी मध्ये आपल्या शाळेतील उत्कृष्ट उपक्रमांचे सादरीकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले देशातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी स्थापित केंद्रस्तरीय गुणवत्ता कक्ष सर्वतोपरी मदत करेल व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन व साहित्य निर्मिती व पालक सभा घेऊन त्यामध्ये मार्गदर्शन करण्याचे व विद्यार्थ्यांच्या समस्याचे निराकरण करंण्याचे ठरले मिटिंग चे सूत्रसंचालन कृष्णा भवर व आभार प्रदर्शन गवळी यांनी केले   यावेळी श्रीमती वर्षा गोर्डे स्वाती जगाडे, तृप्ती जगताप सुप्रिया खेडकर वैशाली भिसे मुख्याध्यापक कोकडे  शिक्षक हराळ शेख शेरखाने चव्हाण धुमाळ इ.उपस्थिती होती.

About kalakridadoot

Check Also

राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – जालना जिल्हा असोसिएशनच्या वतीने दिनांक 28-07-2024 रविवार रोजी जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!