Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांना राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार प्रदान

बीड /प्रतिनिधि : बीड येथील कोहिनूर लाँस येथे दैनिक दिव्यवार्ता व सा. कश्मकश यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार 12 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथे भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पड़ला. या पुरस्कार सोहळयात लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास अनिसोद्दीन इनामदार यांना समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुस्लिम आरक्षण आंदोलन, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक चळवळीत उल्लेखनीय कामगिरी, गोरगरीब व वंचित नागरिकांच्या समस्या विविध अनोख्या आंदोलनातून सोडवण्यासाठी प्रमुख भूमिका घेतल्याने अनेकांना दिलासा व न्याय मिळालेला आहे याची दखल घेत समाजकार्यात अग्रेसर व अमूल्य योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते, लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास अनिसोद्दीन इनामदार यांना मौलाना शफ़ीक़ कासमी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शायर अबरार काशिफ, खानदेश फेम हास्य कलाकार आसिफ अलबेला उर्फ़ जैन्यादादा, प्रसिद्ध इतिहासकार सरफ़राज़ अहमद, भाजपा नेते सलीम जहांगीर, लोकपत्रकार भागवत तावरे, उर्दू संघटना अध्यक्ष मुज्तबा अहमद खान, सभापती ज़ैतूल्ला खान, लोकसेना जिल्हाप्रमुख सुफियान मणियार, संपादक व आयोजक अबुबकर चाऊस, सभापती शेख मोहम्मद सादेख़, समीर सरकार, लोकसेना शहर प्रमुख अयाज़ अख्तर यांच्यासह हजारों नागरिकांच्या उपस्थितीत समाजसेवा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

About kalakridadoot

Check Also

संकटग्रस्त महिलांचा आधार म्हणजे सखी सेंटर…. वनिता पिंपळे.

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – संकटग्रस्त महिलांना तत्काळ आधार , निवारा, उपचार आणि समुपदेशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!