Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

सामाजिक न्यायासाठी प्रश्नांच्या मुळाशी जावे लागेल: भास्कर अंबेकर पुरस्कार वितरण: मुद्रा तर्फे आदर्श विधीज्ञ, शिक्षकांचा गौरव

जालना ( प्रतिनिधी) : डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी, शोषीत, कामगार, महिला, शेवटच्या घटकांचा विचार करून  राज्यघटनेत सामाजिक न्याय ,घटनादत्त अधिकार अंतर्भूत केले. आज देशात असलेली स्वकेंद्रित व्यवस्था , अनेक प्रश्न उद्दभवले असून सामाजिक न्याय अधिक वृध्दींगत करण्यासाठी बुध्दीवंतांना प्रश्नांच्या मुळाशी जावे लागेल. अशी अपेक्षा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केली.
मुद्रा साहित्य सेवा संस्थेच्या वतीने मंगळवारी ( ता. 30) जागृती दिनानिमित्त आदर्श विधीज्ञ, शिक्षक पुरस्कार वितरण व कविसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी रमेश देहेडकर हे होते.
माजी न्यायमूर्ती मनोहर आगलावे, मधुकर जोशी, डॉ. राजेंद्र गाडेकर ,इंजि.संजय कसबे, कवी कैलास भाले, सत्कार मुर्ती अॅड. किरण चन्ने, अॅड. अश्विनी धन्नावत, मिलींद लांबे, रिता सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भास्करराव अंबेकर म्हणाले, घटनाकारांनी मतांचे स्वातंत्र्य, बहुमूल्य अधिकार दिला. मात्र या विषयी जागृती नसल्याने राजकारणाचे गुन्हेगारी करण होऊन लोकशाही धोक्यात येण्याची भिती  व्यक्त करत सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ शकतो का याचा विचार बुध्दीवंतांनी करावा.असे भास्करराव अंबेकर यांनी नमूद केले. मुद्रा संस्थेमार्फत संवैधानिक कर्तव्य, अधिकार सामान्य माणसांत रुजविण्याचे सुरू असलेले कार्य,सामाजिक बांधिलकीतून केला जाणारा गौरव सोहळा कौतुकास्पद असून असेच उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा ही भास्करराव अंबेकर यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात रमेश देहेडकर यांनी  लोकप्रतिनिधींकडूनच संविधानाची अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त करत संविधान प्रत्येकाने डोक्यात घेण्याची गरज आहे. असे सांगितले.
प्रास्ताविकात कवी कैलास भाले यांनी भाषा, साहित्य संवर्धनासाठी  मुद्रा संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन नोव्हेंबर महिन्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, संविधान दिन व म.फुले स्मृती दिन या दिनांचे औचित्य साधून जागृती दिन म्हणून गौरव सोहळा आयोजित केल्याचे कैलास भाले यांनी स्पष्ट केले.
माजी. न्या. मनोहर आगलावे, मधुकर जोशी, यांची समायोजित भाषणे झाली. अॅड. अश्विनी धन्नावत, मिलींद लांबे, रिता सावळे यांनी सत्कारास उत्तर दिले.
अडीच हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
सुञसंचालन प्रा. ज्योती पोहेकर व प्रा. चारुशीला दाभाडकर यांनी केले तर  कांतीलाल बनसोडे यांनी आभार
 मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!