Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

सार्वजनिक ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त “चला गुंफूया शब्दांच्या माळा” कविसंमेलन संपन्न

प्राधिकरण निगडी-(प्रतिनिधी)
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या, रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाचा ३९वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष श्री विश्वनाथनजी नायर आणि कोषाध्यक्ष राजेंद्र जी त्रंबके उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिं. चिं. मधील प्रथितयश उद्योजक श्री प्रसादजी कुलकर्णी उपस्थित होते. प्रसादजींनी मोजक्या शब्दांत पण प्रभावी मार्गदर्शन केले. समाजात काम करताना कुठल्याही मदती साठी पडद्या मागचे त्यांचे मदतीचे हात नेहमीच तयार असतात हे त्यांच्या कार्यप्रणालीतून दिसून आले.
विश्वनाथनजी नायर यांच्या हस्ते प्रसादजी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त “चला गुंफूया शब्दांच्या माळा” ह्या स्वरचित कविता वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर ग्रामीण भागातील दोन आदिवासी निवासी शाळांसाठी उपयुक्त असे ग्रंथ दान करण्यात आले.
लोकसेवा शिक्षण संस्था, अनुदानित आश्रम शाळा, वाल्हीवरे, मुरबाड, ठाणे येथील मुख्य अधीक्षक श्री दिलीप पवार आणि अधीक्षक श्री संदीप देशमुख उपस्थित होते. ह्या शाळेत एकूण ३४१ निवासी आदिवासी मुले आणि मुली आहेत. ह्या वेळी संदीप देशमुख यांनी शाळेची माहिती दिली आणि आपले मनोगत व्यक्त केले.
अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळा, तळेरान, ता. जुन्नर, पुणे ह्या शाळेची एकूण विद्यार्थी संख्या ६०० आहे. अतिशय दुर्गम भागातील ह्या शाळेचे मुख्याध्यापक गणेश नलावडे सर आणि श्री खोसे सर ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ह्या दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी पिंपरी चिंचवड येथील सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. शाळेसाठी पायाभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या मदतीची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमात १५ सहभागी कवींनी अतिशय अर्थपूर्ण आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या स्वरचित कविता सादर केल्या.
प्राची देशपांडे , सीताराम करकरे , अर्चना भांडारकर
अपर्णा देशपांडे, नरहरी वाघ ,उज्वला ताई , राजेंद्र जी करंबळकर , शर्मिला देसाई ,शरद जोशी , शिल्पा बिबिकर ,संगम कुलकर्णी ,नितीन कुलकर्णी , सुमती कुलकर्णी , जयंतन इतराजन आणि विनिता श्रीखंडे यांनी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले, तर प्रास्ताविक विश्वास करंदीकर यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय अनघा देशपांडे यांनी करून दिला. काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता श्रीखंडे यांनी केले, कमल खांबे यांनी आभार मानले.

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!