जालना/प्रतिनीधी – सेपाक टाकरा फेडरेशन ऑफ इंडीयाच्या वतीने 26 व्या सबज्युनीयर राष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच दावनगीरी कर्नाटक या ठिकाणी संपन्न झाल्या असुन यात महाराष्ट्राचा संघ सहभागी होवुन चौथ्या स्थानावर राहीला. या महाराष्ट्र संघात जालना जिल्ह्याचा सेपाक टाकरा खेळाडु मोहीत परमेश्वर मोरे सहभागी झाला होता. त्याने महाराष्टाच्या संघात राहुन राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सेपाक टाकरा असोसिएशनचे सचिव शेख चाँद पी.जे., तालुका क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेसी, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, फेंटबॉल चे राष्ट्रीय निरीक्षक शेख अहेमद, क्रीडा कार्यालयाचे शेख हारूण, राहुल गायके, क्रीडा प्रशिक्षक अमोल काटकर आदिंची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी पुष्पहार घालुन व पेढे भरवनु मोहीत मोरे याचे अभिनंदन केले. सेपाक टाकरा सारख्या मान्यता प्राप्त खेळात जिल्ह्यातुन पहिला राष्ट्रीय खेळाडु होण्याचा मान मोहीत मोरे ला प्राप्त झाल्याबद्दल अनेक शुभेच्छा देवुन अभिनंदन केले. त्याच प्रमाणे त्यांनी जिल्हा संघटनाचे सचिव शेख चाँद पी.जे. व मोहीत मोरेचे प्रशिक्षक अमोल काटकर यांचे ही अभिनंदन केले. तसेच जिल्ह्यात सेपाक टाकराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राज्य स्पर्धेत तृतीय स्थानावर राहीलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडुंचासुद्धा सत्कार करण्यात आला. यात प्रणव राठोड, रूद्र्वीर बागल, विराज शेजुळ, अर्णव डोले, मयुर डोले, वरद कोकणे, समर्थ खुरपे, समर्थ तायडे, सौमीत्र जोशी, आदित्य मोरे, गौरव जाधव तसेच सेपाक टाकराच्या मुली खेळाडुंची सुद्धा उपस्थिती होती.
मोहीत मोरे व सर्व खेळाडुंचे ऋषी विद्या स्कुलच्या प्रिन्सीपल डॉ. हेमा सोनटक्के, एमडी. शितल भाला, उपमुख्याध्यापक यशवंत ढोलके, हेड मिस्ट्रेस प्रतिभा गोरंट्याल, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. तुलजेश भुरेवाल, जिल्हा सेपाक टाकरा असोसिएशन, जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन, जालना पिथीयन कॉन्सील चे पदाधिकारी व सदस्य आदिंनी अभिनंदन केले आहे.
