Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

सोळावे महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन संपन्न

खानवडी जिल्हा पुणे-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आयोजित कै बाळासाहेब यादव साहित्य नगरीत सोळावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी ग्रंथपूजन सुनिल तात्या धिवार स्वप्नाली होले सरपंच अशोक बापू यादव शरद यादव यांच्या शुभहस्ते ग्रंथपूजन करून ग्रंथादिंडीने खानवडी गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली.
संमेलनाचे उद्घाटन मा बाबाराजे जाधवराव संमेलनाध्यक्षा ज्येष्ठ कवियत्री डॉ स्वाती शिंदे पवार
यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती मध्ये संमेलनाचे स्वागताध्यक्ष ह.भ.प.जगदीश उंद्रे महाराज ,विजयराव कोलते , मुख्य आयोजक कवी लेखक पत्रकार व्याख्याते दशरथ यादव ,नितीन भागवत, पत्रकार कवी संजय सोनवणे पत्रकार दीपक नाना भोंगळे, पत्रकार दीपक पवार ,प्रा गंगाधर जाधव, रविंद्र फुले हे उपस्थित होते.
ज्योतिबाची पोरं गाती या गीतांचे ध्वनिफीतचे प्रक्षेपण करण्यात आले या गीतांचे गीतकार लोककवी सिनेअभिनेते सीताराम नरके राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी यांच्या गीताने रसिक मंत्रमुग्ध झाले.
विविध वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना सन्मानित केले. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन सुनिल लोणकर यांनी केले.

दुपारच्या सत्रात क्रांतिसूर्य महात्मा फुले या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाचे अध्यक्ष पुरुषोत्तम निकते प्रमुख पाहुणे लोककवी सीताराम नरके ,डॉ बी डी गायकवाड, सहभागी प्रा विनय कुलकर्णी, योगिता कोकरे
या सत्राचे सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले.

तिसऱ्या सत्रात राज्यस्तरीय कविसंमेलनाच्या अध्यक्षा कवियत्री शशी डंबारे यांनी भूषविले.
प्रमुख पाहुणे अरूण कांबळे, स्वाती बंगाळे सहभागी कवी डॉ लक्ष्मण हेंबाडे मंगळवेढा यांना यावर्षीचा महात्मा फुले साहित्य गौरव पुरस्कार तसेच लोककवी डॉ मदन देगावकर बार्शी यांना महात्मा फुले काव्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ मधुकर हुजरे धाराशिव ,देवेंद्र गावंडे पिंपरी, पूजा माळी बारामती, मुस्कान काझी सासवड ,तानाजी जगताप फलटण, डॉ बळीराम ओहोळ, ॲड कैलास बेलेकर, शांतीलाल ननावरे बारामती, संजय सिंगलवार अमरावती, छगन वाघचौरे पुणे ,चंद्रशेखर नाझरीकर सासवड, शिवाजी झुरुंगे बारामती ,अमर सिंग राजे कागल ,पांडुरंग म्हस्के ,चंद्रकांत चाबुकस्वार दौंड ,रविंद्र ठोकळ सांगोला ,प्रा मधुकर कोथंमिरे विदर्भ ,रमाकांत पडवळ धाराशिव, संजय भोरे बारामती ,जयद्रथ आखाडे निगडी, भास्कर भोसले उरूळीकांचन, प्रा अशोक शिंदे वालचंदनगर, डॉ जनार्दन वाघमारे .
कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या शीघ्रकाव्यातून रसाळ वाणीने केले.
सर्व साहित्यिकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले .
कार्यक्रमाचा समारोप कवी राजाभाऊ जगताप यांनी
केला.

About kalakridadoot

Check Also

कवी, लेखक ,कलावंत , खेळाडू , राजकीय नेते यासमवेत समवेत रंगली काव्य मैफिल

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInपुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) नाट्य चित्र कला अकादमी पुणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!