जालना दि. 11 (जिमाका) :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 ते 1.00 दरम्यान जिल्हा परिषद मुलांची प्रशाला, जिल्हा क्रीडा प्रबोधिनी, स्टेशन रोड जालना येथे विद्यार्थ्यामार्फत लोगो तयार करणे, हवेत बलुन सोडणे व देशभक्तीपर गीत-गायनांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास विविध शाळेतील जवळपास एक हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद, कैलास दातखीळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-
