Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य होमगार्ड जिल्हा कार्यालयामार्फत विविध उपक्रम

वर्धा, दि.23 (जिमाका) : होमगार्ड ही एक स्वयंसेवी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातुन समाजाभुमिख अनेक उपक्रम राबविण्यात येतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मिनी मॅरॉथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती.
या स्पर्धेत सोहेल पठाण, अक्षय कळंबे, प्रफुल मानकर, अमोल सातपुते यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविला. स्पर्धेत जिल्हयातील 50 होमगार्ड सदस्यांनी भाग घेतला. तसेच होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण आवारात वृक्षारोपन करण्यात आले. यात विविध जातीचे 25 वृक्ष लावण्यात आले. पोलीस मुख्यालय, वर्धा येथे आयोजित मॅरॉथॉन स्पर्धेत होमगार्ड सदस्यानी भाग घेतला. यात प्रफुल मानकर, गौरव नैताम, योगश बेले, निखिल साठे, सिध्दार्थ जाधव यांनी क्रमांक पटकावले.
वर्धा, हिंगणघाट व आर्वी पथकात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात मोठया संख्येने होमगार्ड सहभागी झाले. होमगार्ड संघटनेच्या माध्यमातुन नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना प्रज्वलित करण्यात आली.
जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र चरडे, राम पिंजरकर, प्र.सु, येवतकर, अनिल यादव, अशोक कोकाटे, हेमलता कांबळे, बाबा तुरक, चंद्रशेखर शेलकर, गजानन ससाने, नितीन शेंडे, कैलास रोकडे, चंद्रशेखर देशकर, मनोहर ढवळे, गणेश नौकरकार, आकाश वाकेकर, सागर थेरे, सुधिर बिसेन, दिवाकर नाखले, राजेद्र ढबाले, विकास थोरात व अनेक मानसेवी होमगार्ड व अधिकारी यांनी कार्य केले.

About kalakridadoot

Check Also

शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवा – पोलिस अधीक्षक तुषार दोशी

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInकर्जत येथील राजुरेश्वर मध्ये ‘मी कसा घडलो’ कार्यक्रमात प्रतिपादन… अंबड/ प्रतिनिधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!