जालना, दि.18 शहरातील काद्राबाद भागातील उतारगल्ली येथे शिवसेना शहर प्रमूख दुर्गेश काठोटीवाले व काठोटीवाले परिवाराच्या वतीने दिनांक 25 ते 31 जुलै 2023 या कालावधीत पं.मनोज महाराज गौड यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे.
या सप्ताहासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे स्तंभपूजन पं.मनोज महाराज गौड व शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुंदनलाल काठोटीवाले, नंदलाल भुरेवाले, बबन भगत, घनश्याम खाकीवाले, दीपक भुरेवाले, राजहंस जाधव, बिहारी परदेशी, हरिभाऊ अग्रवाल, गोपाल काबलिये, आश्विन अंबेकर, आयोजक दुर्गेश काठोटिवाले आदींची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, अधिक मास हा हिंदू धर्मात पवित्र अत्यंत मानला जातो त्याचे महत्त्व लक्षात घेऊन काठोठीवाले परिवाराने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे. कथा श्रवणाने मानवी मनावर चांगले संस्कार रुजण्यास मदत होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवी नातेसंबंध ठिसूळ होताना दिसत आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांची अत्यंत गरज असते. ही गरज ओळखून काठोटीवाले परिवाराने श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन केले हे अत्यंत स्तुत्य आहे. हा परिवार सातत्याने सर्वांच्या सुखदुःखात व सामाजिक कार्यात सदैव पुढे असतो. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी काठोटीवाले परिवाराच्या वतीने पावसाळा लक्षात घेउन व भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाटरप्रूफ सभा मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. तरी शहरातील व परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून श्रीमद् भागवत कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी केले.
यावेळी कचरूलाल भगत, प्रेम जांगडे, गणेश जाफराबादी, संजय परिवाले, सुधीर दुसाने, इंदर गौरक्षक, संतोष मेघावाले, किशोर नरवडे, सोपान दुसाने, धनराज बटवाले, मुकेश जांगडे, सतपाल खाकीवाले, रवी नवघरे, बापू शिंदे, सुभाष पितांबरे, सेवक नारियलवाले, भावेश जांगडे, मयूर नारियलवाले, अरविंद पवार, गणेश काठोटीवाले, बालाजी एलगुंदे, सचिन गाजरे, बबन काजळे, चंदू घोडके, अजय मिसाळ, राजेश देवावाले, कैलास मिसाळ, यश अग्रवाल, आकाश खर्डेकर, मयूर धोत्रे, दिनेश मोहिते, सुरज बटवले, कृषी आगळे, अर्जुन सावजी, चेतन गुप्ता, कुणाल अन्नलदास, मोहन डहाके, दिनेश डहाळे, अशोक पवार, सागर मेघावाले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
