Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवा – पोलिस अधीक्षक तुषार दोशी

कर्जत येथील राजुरेश्वर मध्ये ‘मी कसा घडलो’ कार्यक्रमात प्रतिपादन…

अंबड/ प्रतिनिधी – मी शाळेत असताना मला अभ्यासाबरोबरच वाचनाची सवय जडली त्यामुळे चालू घडामोडी सह महत्वाची माहिती मिळण्यास मदत झाली. त्याचबरोबर मला सर्व जाती धर्माचे मित्र असल्यामुळे मला समतेची शिकवण मिळाली.पुणे येथे पदवी शिक्षण घेत असताना आर्मी ,एन.डी.ए मध्ये जाण्याचा माझा कल होता.परंतु त्यापेक्षा ही जनसेवेसाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक ही पदे मोठी आहे अशी माहिती मित्राकडुन मिळाली.आणि तेथुन मी युपीएससी कडे वळालो.या दरम्यान अभ्यासाबरोबरच खेळाकडे लक्ष दिले.जनरल नाॅलेज, मासिके चे नियमीत वाचन यामुळे माझे ध्येय गाठणे मला सोपे झाले. याचा फायदा मला मुलाखतीसाठीही झाला . त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवावी असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात बोलताना भिमराव पाटील डोंगरे आबा यांनी ‘मी कसा घडलो’ या उपक्रमाचे महत्व सांगत विद्यार्थ्यांना मोठ्या अधिकार्यांचे मार्गदर्शन हे भविष्यासाठी मोलाचे ठरणार आहे.ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना या माध्यमातून उच्च पदाचे ध्येय गाठणे सोपे होणार आहे.संस्थेच्या ब्रीदवाक्य प्रमाणे हे कार्य पुढे चालू ठेवले जाणार आहे.असे प्रतिपादन डोंगरे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
राजुरेश्वर शिक्षण संशोधन सेवा संस्था संचलीत राजुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत ता अंबड येथील विद्यालयात शुक्रवारी (दि-१८) रोजी ‘मी कसा घडलो ‘ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलिस अधीक्षक दोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संवाद साधला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भिमराव पाटील डोंगरे आबा,तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, सचिव डॉ.राहुल डोंगरे, माजी सरपंच विजय डोंगरे, सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, भाऊसाहेब डोंगरे, सरपंच संजय काळुंके, उपसरपंच आण्णासाहेब डोंगरे, तलाठी सुलाने, चेअरमन ज्ञानेश्वर डोंगरे, माजी सरपंच श्रीहरी डोंगरे, सुदर्शन महाराज शिंदे , सखाराम वाघ, नसीरभाई शेख, ब्रम्हदेव मुंढे,गवळी, अॅड सुलाने, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवातीला लेझीम पथकाव्दारे स्वागत करण्यात आले.मंचावर दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.
प्रस्ताविक प्राचार्य विलास टकले, सुत्रसंचलन प्रा.सुभाष जिगे, परिचय जीवन झिजुर्डे, आभार सुंदर बुनगे यांनी मानले.
यावेळी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About kalakridadoot

Check Also

जालना शहर म.न.पा. मुर्गी तलाव शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षक दिनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!