जालना, प्रतिनीधी (दि.15) नुकत्याच अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धा 2023 मध्ये *चि.कृष्णा भरत परदेशी* याने सुयश मिळविले.
या स्पर्धेत राज्यभरातून अत्यंत मोठया प्रमाणावर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. जालना येथील चि.कृष्णा परदेशी याने उत्तम कामगिरी करत रिध्मिक या योग प्रकारात राज्यात चौथा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन करीत जिल्ह्याचा नावलौकिक केला. त्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख *मा.श्री.भास्करराव अंबेकर* यांनी त्याचा शहारातील शांतिनिकेतन विद्यामंदिर येथे पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन छोटेखानी गौरव करुन उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख श्री.बाला परदेशी, श्री.विक्रमजी माने, श्री.गणेश लाहोटी, श्री.भरत परदेशी, श्री.गोविंद राठोड, श्री.विजय बोडले आदींची यावेळी उपस्थिती होती.